Nureca IPO : १५ फेब्रुवारीला लाँच होणार १०० कोटींचा आयपीओ, पाहा काय असेल प्राईज बँड, लॉट साईज
By जयदीप दाभोळकर | Updated: February 9, 2021 13:49 IST
1 / 15गेल्या काही दिवसांमध्ये आयपीओमध्ये गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत असल्याचं दिसून येत आहे. २०२१ या नव्या वर्षात एका मागोमाग एक नवे आयपीओ लाँच होत आहेत.2 / 15आतापर्यंत आयपीओमध्ये गुंतवणूक केली नसेल तर आता एक नवा आयपीओ लाँच होणार आहे.3 / 15१५ फेब्रुवारी रोजी न्यूरेका लिमिटेडचा १०० कोटी रूपयांचा आयपीओ लाँच होणार असून तो १७ फेब्रुवारीपर्यंत खुला राहणार आहे. 4 / 15यासाठी ३९६ ते ४०० रूपये प्रति शेअर प्राईज बँड ठरवण्यात आला आहे. हा शेअर बीएसई आणि एनएसई दोन्ही इंडेक्सवर लिस्ट केला जाईल. 5 / 15कंपनीनं १० रूपयांच्या फेस व्हॅल्यूवर प्रति शेअर प्राईज बँड ३९६ ते ४०० रूपये इतका ठेवला आहे, आयपीओच्या एका लॉटमध्ये ३५ शेअर्स असतील.6 / 15याचाच अर्थ गुंतवणूकदारांना कमीतकमी १४ हजार रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसंच याच गुणाकारात आणखीही लॉट गुंतवणूकदारांना घेता येतील.7 / 15न्यूरेका लिमिटेडच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी ७५ टक्के हिस्सा आरक्षित ठेवला आहे. 8 / 15तर किरकोळ गुंतवणूदारांसाठी १० टक्के हिस्सा आरक्षित आहे. तर दुसरीकडे नॉन कॅटेगरीसाठी १५ टक्के हिस्सा आरक्षित ठेवण्यात आला आहे.9 / 15५० लाख रूपयांचे शेअर्स कंपनीकडून आपल्या योग्य कर्मचाऱ्यांसाठीही आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रति शेअर २० रूपयांची सूटही देण्यात येईल. 10 / 15३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीकडे एकूण १०२.४८ कोटी रूपयांची एकूण असेट्स होते. 11 / 15तर कंपनीचं एकूण उत्पन्न १२२.९७ कोटी रूपये होते. न्यूरेकाचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स ३६.१८ कोटी रूपये इतकं होतं. 12 / 15आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनी आपल्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. तर जनरल कॉर्पोरेट परपझसाठीही कंपनी या रकमेचा वापर करेल.13 / 15सौरभ गोयल हे या कंपनीचे प्रमोटर आहेत. न्यूरेका लिमिटेड हेल्थकेअर आणि वेलनेस प्रोडक्ट डिस्ट्रिब्यूटर आहे.14 / 15कपनीचं ध्येय आपल्या ग्राहकांना बेस्ट क्वालिटी, ड्युरेबल आणि इनोव्हेटिव्ह टूल्स देत त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा होणं हे आहे. 15 / 15कंपनीकडे वेल डायव्हर्सिफाय पोर्टफोलियो असून यात क्रॉनिक डिझिज प्रोडक्ट, ऑर्थोपेडिक्स प्रोडक्ट, मदर अँड चाईल्ड प्रोडक्ट, न्यूट्रिशन्स सप्लिमेंट आणि लाईफस्टाईल पोडक्ट्स आहेत.