शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खरेदी न करता वापरता येणार मारुतीची नवीकोरी कार, मुंबईसह या चार शहरांत मिळतेय ऑफर

By बाळकृष्ण परब | Published: November 24, 2020 4:07 PM

1 / 6
जर तुमची कार खरेदी करण्याची इच्छा आहे. पण बजेटमुळे कार खरेदी करणे शक्य होत नसेल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. मारुतीत सुझुकीने मारुती-सुझुकी सबस्क्राइब नावाची ऑफर सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही नवी कार घरी आणता येऊ शकते. आता कंपनीने या योजनेचा विस्तार केला आहे.
2 / 6
कंपनीने मारुती-सुझुकी सबस्क्राइब या योजनेचा विस्तार अजून चार शहरांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि गांधीनगर या शहरांचा समावेश आहे. आता पुढील तीन वर्षांत देशातील ६० शहरांमध्ये ही योजना विस्तारण्याचा कंपनीचा मानस आहे.
3 / 6
मारुतीने याबाबत प्रसिद्ध केलेल्या आपल्या वक्तव्यात सांगितले की, या योजनेसाठी ओरिक्स कॉर्पोरेशन, जपानमधील ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेससोबत करार करण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीने मारुती-सुझुकी सबस्क्राइब कार्यक्रम दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे शहरात सुरू केला होता.
4 / 6
मारुतीने सांगितले की, या योजनेंतर्गत ग्राहकांना वाहनाचे स्वामित्व न मिळवता नव्या कारचा वापर करता येणार आहे. यासाठी त्यांना मासिक शुल्क द्यावे लागेल. या शुल्कामध्ये देखरेख, वीमा आणि रस्त्यावर वाहन बिघडल्यास मदत आदींचा समावेश आहे.
5 / 6
मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक (विपणण आणि विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेल्या सुरुवातीनंतर काही महिन्यांतच ग्राहकांकडून ६ हजार ६०० हून अधिक वेळा विचारणा झाली आहे.
6 / 6
या कार्यक्रमांतर्गत ग्राहकांना मारुती सुझुकी एरिनाकडून स्विफ्ट डिझायर, विटारा ब्रेझा आणि एर्टिगा, बलेरा, सियाझ आणि एक्सएल६ या कार खरेदी करण्याचा पर्याय स्वीकारता येईल. वाहनाचे मॉडेल आणि शहरानुसार सबस्क्रिप्शन शुल्क वेगवेगळे आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारbusinessव्यवसायMumbaiमुंबई