आता चीनमधून बोगस, निकृष्ट माल येणार नाही; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय
By कुणाल गवाणकर | Updated: November 20, 2020 20:05 IST
1 / 10चीनमधून आलेल्या मालाची, वस्तूची कोणतीही गॅरंटी देता येत नाही, असं म्हणतात. 'चला तो चांद तक, वरना शाम तक' अशा शब्दांत चिनी मालाचं वर्णन केलं जातं.2 / 10चीनमधून आलेल्या अनेक वस्तूंची, उत्पादनांची कोणतीही खात्री देता येत नाही. या वस्तू स्वस्त असल्या तरीही त्या किती दिवस चालतील हे कोणालाही सांगता येणार नाही.3 / 10चिनी वस्तूंच्या टिकाऊपणाची खात्री नसल्यानं अनेकांची फसवणूक होते. त्यामुळे मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.4 / 10चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणं येतात. त्यांच्या दर्जाबद्दल कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यामुळे मोदी सरकारनं आयात होणाऱ्या ७ उत्पादनांसाठी नोंदणी अनिवार्य केली आहे. तसा आदेशच सरकारनं काढला आहे.5 / 10डिजिटल कॅमेरा, व्हिडीओ कॅमेरा, वेबकॅम, ब्ल्यूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, वायरलेस हेडसेट, एलईडी डिमर या ७ उत्पादनांसाठी आता नोंदणी अनिवार्य असेल.6 / 10चीनमधून आयात होणाऱ्या ७ उत्पादनांना ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडे प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच ही उत्पादनं भारतात येतील.7 / 10मोदी सरकारनं ७ उत्पादनांची यादी जागितक व्यापार संघटनेला पाठवली आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कंपन्यांना ३ महिन्यांचा अवधी मिळेल.8 / 10ज्या उपकरणांचा दर्जा चांगला नसेल त्यांना ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचं प्रमाणपत्र मिळणार नाही. याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय ग्राहकांना होईल.9 / 10आतापर्यंत चिनी उपकरणांना ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचं प्रमाणपत्र मिळवणं बंधनकारक नव्हतं. मात्र आता भारतात उत्पादनं पाठवण्यासाठी चिनी कंपन्यांना परवाना गरजेचा असेल.10 / 10मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे निकृष्ट दर्जाची उपकरणं भारतीय बाजारात येणार नाही. याचा दुसरा फायदा भारतीय उत्पादकांना होईल. त्यामुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना मिळेल.