शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१२.७५ लाखांचे उत्पन्न कसे करमुक्त होणार? जाणून घ्या पूर्ण कॅल्क्युलेशन...; वरचे ७५ हजार कसे मॅनेज करायचे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:39 IST

1 / 7
यंदाचे संपूर्ण बजेट हे १२ लाखांचे उत्पन्न करमुक्तवरच फिरू लागले आहे. या उत्पन्नात देशातील सर्वात मोठा मध्यमवर्ग मोडतो. त्याचा करच थेट शुन्यावर नेऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे आता या करदात्यांना कराचे पैसे वाचविण्यासाठी कुठेही इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा दाखविण्याची गरज राहिलली नाही.
2 / 7
आतापर्यंत ७ लाखापर्यंत टॅक्स फ्री असलेले उत्पन्न थेट १२ लाखांवर गेले आहे. या करमुक्त उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिली एक गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे जर तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिमीवर असाल तर तुम्हाला न्यू टॅक्स रिजिमी निवडावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा सीए किंवा नोकरदार असाल तर तुमच्या कंपनीच्या अकाऊंट विभागाशी चर्चा करावी लागणार आहे.
3 / 7
नवीन कर प्रणालीमध्ये, १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न अजूनही १० टक्के कर स्लॅबमध्ये येते. यामुळे करदात्यांना त्यांचे १२.७५ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त कसे होईल असा प्रश्न पडला आहे. ०-४ लाख रुपयांवर कर शून्य आहे. त्याच वेळी, ४ ते ८ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के आणि ८ ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १० टक्के कर आकारला जातो. २४ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर सर्वाधिक ३० टक्के कर आकारला जाणार आहे.
4 / 7
आयकर कलम 87A अंतर्गत आयकर विभाग ही कर सवलत देत असतो. जुन्या कर व्यवस्थेसाठी हे १२,५०० रुपये आणि नवीन कर व्यवस्थेसाठी ६०,००० रुपये अशी ही सवलत आहे. नव्या कर प्रणालीनुसार जर तुम्हाला येत असलेला कर हा ६०००० रुपयांपेक्षा कमी असेल तर तो थेट माफ होऊन जातो.
5 / 7
४ ते ८ लाख रुपयांवर ५% टक्के कर भरावा लागतो. तो २० हजार रुपये होतो. ८ लाख ते १२ लाख रुपयांवर, तुम्हाला १० टक्के कर भरावा लागेल, जो ४०,००० रुपये होतो. आता या दोन्ही टप्प्यांचा एकत्र कर हा ६०००० रुपये होतो. जो तुम्हाला दिलेल्या सवलतीएवढा आहे. यामुळे तो माफ केला जाणार आहे.
6 / 7
आत जर तुमचे उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि १२.७५ लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट जी नवीन कर प्रणालीमध्ये ग्राह्य आहे ती दाखवावी लागणाक आहे. यामुळे तुमचे वरचे ७५००० रुपये स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत माफ होतील आणि तुम्ही या करमुक्तीच्या रकमेत बसू शकणार आहात.
7 / 7
यामुळे नोकरदार वर्गाने पुढील वर्षी होणारी पगारवाढ, बोनस, पऱफॉर्मन्स पे किंवा इन्सेंटिव्ह आदीचा हिशेब घालून गुंतवणूक करावी. असे केल्यास तुमचा वरच्या ७५ हजारावर द्यावा लागणारा कर वजा होऊ शकतो.
टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Income Taxइन्कम टॅक्सNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन