1 / 9मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, सरकार सुकन्या समृद्धी योजना (SSY) चालवते. जर तुमची मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, तर तुम्ही तिच्या नावानं या योजनेत गुंतवणूक करू शकता. सध्या, सुकन्या समृद्धीवर ८.२ टक्के दरानं व्याज मिळत आहे. या योजनेत, तुम्हाला तुमच्या मुलीसाठी १५ वर्षांसाठी योगदान द्यावं लागेल आणि ही योजना २१ वर्षांत मॅच्युअर होते.2 / 9तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे जितक्या लहान वयात गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्ही तिच्यासाठी मॅच्युरिटी रक्कम वापरू शकाल. जर तुम्ही तिच्या जन्मापासूनच सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुमची मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत तिच्यासाठी चांगली रक्कम तयार होईल. दरमहा १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपये गुंतवून तुमची मुलगी किती 'श्रीमंत' होईल ते जाणून घेऊ.3 / 9फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या घराचा फोटो घ्या साईज वाढली पण कार्पेट एरिया झाला कमी (टेक्स्ट)4 / 9जर तुम्ही दरमहा २००० रुपये किंवा वर्षाला २४००० रुपये जमा केले तर तुमची एकूण गुंतवणूक ३,६०,००० रुपये होईल आणि तुम्हाला ७,४८,४१२ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याज जोडल्यास एकूण रक्कम ११,०८,४१२ रुपये होतील.5 / 9दरमहा ३००० रुपयाप्रमाणे तुम्हाला वार्षिक एकूण ३६,००० रुपये जमा करावे लागतील. अशा प्रकारे, तुमची एकूण गुंतवणूक ५,४०,००० रुपये होईल. सध्याच्या व्याजदरानुसार, तुम्हाला ११,२२,६१९ रुपये व्याज म्हणून मिळतील. मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला एकूण १६,६२,६१९ रुपये मिळतील.6 / 9जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ४००० रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी ४८००० रुपये जमा करावे लागतील. अशा प्रकारे, तुम्ही १५ वर्षांत एकूण ७,२०,००० रुपये जमा कराल, परंतु तुम्हाला १४,९६,८२५ रुपये व्याज म्हणून मिळतील. मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला तुमच्या मुलीसाठी एकूण २२,१६,८२५ रुपये मिळतील.7 / 9जर तुम्ही दरमहा ५००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकत असाल, तर तुम्ही या योजनेद्वारे तुमच्या मुलीसाठी एक चांगला निधी निर्माण करू शकता. दरमहा ५००० रुपयांच्या दराने, गुंतवणूक दरवर्षी ६०००० रुपये होईल. अशा प्रकारे, तुम्ही १५ वर्षांत एकूण ९,००,००० रुपये गुंतवाल. ८.२% व्याजदरानं, तुम्हाला व्याज म्हणून १८,७१,०३१ रुपये आणि मॅच्युरिटीवर २७,७१,०३१ रुपये मिळतील.8 / 9जर तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतवले तर तुम्ही एका वर्षात एकूण १,२०,००० रुपये गुंतवाल. ८.२ टक्के दरानं, तुम्हाला यावर ३७,४२,०६२ रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटी रक्कम ५५,४२,०६२ रुपये असेल.9 / 9सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही दरवर्षी किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही दरवर्षी १,५०,००० रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुमची मुलगी ६९,२७,५७८ रुपये किंवा सुमारे ७० लाख रुपयांची मालक होईल.