1 / 8Investment Tips: नोकरी आणि जबाबदाऱ्यांनी भरलेल्या आयुष्यानंतर निवृत्ती हा निवांत आणि मजेशीर काळ जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पैशाचं टेन्शन नाही, फिरण्यापासून ते आपले छंद पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण मोकळं असायला हवं. पण असं आनंदानं जीवन जगायचं असेल तर योग्य वेळी आर्थिक नियोजन करण्याची गरजदेखील असते.2 / 8सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, त्यासाठी दरमहा किती पैसे जोडायचे आणि किती गुंतवणूक करायची? याचं उत्तर तुमच्या वयावर अवलंबून असतं. हे गणित सोप्या भाषेत समजून घेऊया की जर तुमचं वय २५, ३० किंवा ३५ वर्षे असेल आणि तुम्ही रिटायरमेंट फंडाचं उद्दिष्ट ५ कोटी रुपये ठेवलं असेल तर तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल.3 / 8समजा तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त व्हायचं असेल आणि तुम्हाला ५ कोटी रुपयांचा फंड जमा करायचा असेल तर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागेल. आजच्या काळात म्युच्युअल फंड ही महागाईवर मात करण्याची ताकद असणारी योजना असं म्हणतात. दीर्घकाळात तुम्ही या योजनेत मोठी रक्कम जोडू शकता. दीर्घ मुदतीत या योजनेचा परतावा १२ टक्क्यांच्या आसपास मानला जातो.4 / 8गणितात जाण्यापूर्वी 'कंपाउंडिंग'ची जादू समजून घेऊया. याचा अर्थ तुम्हाला केवळ तुमच्या मुद्दलावरच नव्हे तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावरही व्याज मिळतं. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल, तितका जास्त वेळ तुम्हाला कंपाउंडिंगचा फायदा मिळेल आणि तुमचा पैसा तितक्या वेगानं वाढेल.5 / 8जर तुमचं वय २५ वर्ष असेल गुंतवणुकीला सुरुवात करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. आपल्याकडे निवृत्तीपर्यंत पूर्ण ३५ वर्षे (६० वर्षे) आहेत. कंपाउंडिंगची शक्ती तुमच्यासाठी सर्वात जास्त काम करेल. जर तुम्ही दर महिन्याला ९,१०० रुपयांची एसआयपी करत असाल तर वयाच्या ६० व्या वर्षी तुमच्याकडे ५,०१,४८,५६३ रुपये असतील. गुंतवणुकीला लवकर सुरुवात करण्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे.6 / 8जर आपण २५ व्या वर्षी सुरुवात केली नाही तर घाबरू नका. वयाच्या ३० व्या वर्षीही सुरुवात करून तुम्ही उत्तम रिटायरमेंट फंड तयार करू शकता. तुमच्याकडे ३० वर्षांचा दीर्घ कालावधी आहे. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला १६,५०० रुपयांची एसआयपी करावी लागेल. ३० वर्षांत तुमची गुंतवणूक ५९,४०,००० रुपये असेल. १२ टक्क्यांच्या परताव्यासह मॅच्युरिटीवर तुम्हाला ५,०८,३६,०५८ रुपये मिळतील.7 / 8तुमचे वय ३५ वर्षे असलं तरी गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे, पण आता तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी अधिक गांभीर्य दाखवावं लागेल. तुमच्याकडे फक्त २५ वर्षे शिल्लक असतील. जर तुम्ही २५ वर्षांसाठी दरमहा ३०,००० रुपये गुंतवले तर १२% परताव्यानुसार तुम्हाला २५ वर्षांत ५,१०,६६,१९७ रुपये मिळतील. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे उशीर झाल्याने तुमच्या गुंतवणुकीची रक्कमही वाढते. गुंतवणकीला जितका उशीर कराल तितका खिशावरचा बोजा वाढेल.8 / 8(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)