शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ जूनपासून बदलणार पैशांशी निगडीत 'हे' महत्त्वाचे नियम, खिशावर थेट होणार परिणाम

By जयदीप दाभोळकर | Updated: May 27, 2025 09:10 IST

1 / 7
New Rules from 1 June: दर महिन्याच्या एक तारखेप्रमाणे, या महिन्यातही १ जून २०२५ रोजी काही नवीन बदल होणार आहेत. १ जून रोजी होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम सामान्य व्यक्तींच्या खिशावर आणि त्यांना मिळणाऱ्या सेवांवर होईल. एलपीजी गॅस सिलेंडर ते क्रेडिट कार्ड अशा अनेक नियमांमध्ये बदल केले जाऊ शकतात. १ जून रोजी होणाऱ्या या बदलांचा लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया १ जून रोजी कोणते मोठे बदल होऊ शकतात.
2 / 7
जून महिना सामान्य माणसासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, खरं तर, १ जूनपासून असे काही बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. एलपीजी गॅसच्या किमतीपासून ते एफडी व्याजदरापर्यंत, १ जून रोजी अनेक महत्त्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत.
3 / 7
जूनमध्ये ईपीएफओशी संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सरकार ईपीएफओची नवीन व्हर्जन ३.० लाँच करणार आहे, ज्यामुळे पीएफ काढणं, डेटा अपडेट करणं आणि क्लेम करणं सोपं होणार आहे. याअंतर्गत एटीएमसारख्या कार्डमधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.
4 / 7
१ जून २०२५ पासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू केले जाऊ शकतात. ऑटो-डेबिट फेल झाल्यास २ टक्के दंड, युटिलिटी बिल आणि इंधन खर्चावर अतिरिक्त शुल्क, आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आणि रिवॉर्ड पॉईंट्समध्येही कपात होऊ शकते.
5 / 7
१ जून २०२५ पासून एटीएम व्यवहार नियमांमध्ये काही बदल होऊ शकतात. यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ समाविष्ट आहे. म्हणजेच, एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन शुल्क लागू होऊ शकतं.
6 / 7
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत महत्त्वाचे बदल होतात. अशा परिस्थितीत, यावेळी देखील १ जून २०२५ रोजी गॅस सिलिंडरची किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केल्यानं त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे.
7 / 7
१ जून रोजी एफडी व्याजदर कमी किंवा वाढवले जाऊ शकतात. बहुतेक बँका ६.५% ते ७.५% दरम्यान व्याज देत असल्या तरी, जूनपासून हे दर देखील कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
टॅग्स :businessव्यवसायbankबँकCylinderगॅस सिलेंडर