सबकी पसंद 'निरमा'... प्रसिद्ध वॉशिंग पॉवडर कंपनीच्या शेअर्सची आजची किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 10:54 IST
1 / 10 दूरदर्शनचा काळ आणि जाहिरातींचा भडीमार सुरू होता, त्याच काळात एका जाहिरातीने देशातील प्रत्येकाच्या घरातघरात आपलं स्थान निश्चित केलं. विशेष म्हणजे या जाहिरातीनंतर निरमा वॉशिंग पावडरही घराघरात पोहोचली. 2 / 10देशभरात एकेकाळी 10 घरांपैकी 6 घरांमध्ये निरमा वॉशिंग पावडर वापरली जात असे. तीच वॉशिंग पावडर आता घराघरांतून आऊटडेटड झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 3 / 10कारण करसन भाई पटेल यांच्या यशाचं शिखर कोणेएकेकाळी अवकाशापर्यंत पोहोचलं होतं. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात निरमा वॉशिंग पावडर मागे पडताना दिसत आहे. 4 / 10शेअर मार्केटमध्ये कंपनीचे मुल्यांकन कमी असून कंपनीच्या उत्पादनाचा विस्तारही ६० टक्क्यांहून ६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. कंपनीच्या एनएसई मार्केटमधील शेअर्सची आजची किंमत २५५ रुपये इतकी आहे. 5 / 10एका सायकलवरुन सुरु केलेली उत्पादन विक्रीने थेट १७ हजार कोटीपर्यंतचा पल्ला गाठला होता. देशभरात एफएमसीजी कंपन्यांनीही ज्यांनी टक्कर दिली तीच कंपनी आज स्पर्धेत मागे पडलीय. 6 / 10गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात शेतकरी कुटुंबातील करसन भाई पटेल यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम केलं. 7 / 10परंतु लवकरच त्यांना गुजरात सरकारच्या खनिकर्म आणि भूविज्ञान विभागात सरकारी नोकरी मिळाली. सरकारी नोकरी असूनही करसनभाईंना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. 8 / 10करसन भाई निरमाच्या नावाने उत्पादनं बनवू लागले. पण बाजारात असलेल्या HUL सारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण होते. त्यासाठी त्यांनी नवनवीन रणनीती अवलंबली. 9 / 10प्रत्येक पॅकेटवर लिहायला सुरुवात केली – कपडे स्वच्छ नसल्यास पैसे परत.. लोकांनी हे पसंत पडू लागलं आणि लोकांकडून खरेदी सुरु झाली आणि दर्जेदार उत्पादनाने आत्मविश्वास निर्माण केला. 10 / 10लवकरच त्यांच्या उत्पादनाची मागणी वाढू लागली. व्यवसायात झालेली वाढ पाहून करसनभाईंनी सरकारी नोकरी सोडून बाजाराकडे पूर्ण लक्ष द्यायला सुरुवात केली.