शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खरेदी करताना फक्त 'या' टिप्स वापरा; दिवाळीत पैसा आणि वेळ दोन्हींची होईल बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:15 IST

1 / 8
दिवाळीचा सण दारावर आला असून सगळीकडे खरेदीचा हंगाम सुरू झाला आहे. सणासुदीच्या निमित्ताने घर सजावटीच्या वस्तूंपासून ते कपडे, भेटवस्तू अशी बरीच खरेदी करावी लागते. सणासुदीच्या काळात ऑनलाइन प्लॅटफॉर्मपासून ते मार्केटमध्ये शोरूमपर्यंत बपर ऑपर्स आहेत.
2 / 8
सवलती आणि आकर्षक ऑफरमुळे लोक आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी करतात. त्यामुळे खरेदीत बराच वेळ तर वाया जातोच शिवाय चांगला पैसाही खर्च होतो. मात्र, तुम्ही जर काही टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या वेळेसोबत पैसाही वाचेल.
3 / 8
दिवाळीची खरेदी करण्यापूर्वी आवश्यक वस्तूंची यादी तयार करा. त्यानुसार तुम्हाला बजेटही काढता येईल. यामुळे अनावश्यक खरेदी टाळता येईल. यात तुमचा वेळ आणि पैसाही वाचेल.
4 / 8
ऐन सणासुदीत बाजारपेठा गर्दीने तुडूंब भरतात. अशा परिस्थितीत ट्रॅफिकमध्ये तुमचा खूप वेळ वाया जातो. म्हणून, शक्य तितक्या लवकर आपले खरेदीचे काम पूर्ण करणे चांगले आहे.
5 / 8
तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग आवडत नसेल, तर ऑफलाइन शॉपिंग स्मार्ट पद्धतीने करा. प्रत्येक शहरात सजावट, कपडे, फॅब्रिक्स, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादीसाठी वेगवेगळे बाजार प्रसिद्ध असतात. अशा वस्तू त्याच बाजारातून घेतल्यास वैविध्य आणि स्वस्तात मिळू शकतात.
6 / 8
तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग करायला आवडत असेल तर क्रेडिट कार्डने शॉपिंग करा. यामुळे तुमचे खूप पैसे वाचतील. यामध्ये तुम्हाला नो-कॉस्ट ईएमआयपासून कॅशबॅक आणि चांगल्या रिवॉर्ड पॉइंट स्कीमपर्यंतच्या ऑफर मिळू शकतात.
7 / 8
दिवाळीसाठी कोणतीही वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करायची असेल, तर ती ऑनलाइन खरेदी करण्याऐवजी स्थानिक घाऊक बाजारातून खरेदी करा. येथे तुम्हाला मालाची गुणवत्ता लगेत तपासता येईल. घाऊक दरात माल खरेदी केल्याने मोठी सूट मिळेल.
8 / 8
ऑनलाइन वस्तू खरेदी करताना इतर वेबसाईट्सवर किमतीची तुलना करा. अनेक वेळा एकच वस्तू वेगवेगळ्या वेबसाइटवर वेगवेगळ्या किमतीत उपलब्ध असते. अशा परिस्थितीत जिथे तुम्हाला चांगली डील मिळेल तिथून खरेदी करा.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Shoppingखरेदी