1 / 11देशाला कोरोना संकटाचा मोठा फटका बसला असून उद्योगधंदे ठप्प असल्यानं देशाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.2 / 11कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे उद्योगधंदे ठप्प आहेत.3 / 11एकीकडे कोरोना संकटामुळे आरोग्य व्यवस्थेवरील खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे महसूलच मिळत नसल्यानं सरकारी तिजोरीवर परिणाम होत आहे.4 / 11कोरोना संकट येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था मंदीसदृश्य परिस्थितीतून जात होती. त्यात आता कोरोनानं भर घातली आहे. 5 / 11अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ मे रोजी २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या १० टक्के असल्याचं मोदी म्हणाले.6 / 11अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मात्र यानंतर परदेशातील अनेकांनी त्यांची गुंतवणूक काढून घेतली.7 / 11मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एफपीआय (फॉरेन पोर्टफोलियो इन्व्हेस्टमेंट) गुंतवणूकदारांनी ६ हजार ६६ कोटी रुपये काढून घेतले. नॅशनल सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज लिमिटेडनं (एनएसडीएल) याबद्दलची आकडेवारी जाहीर केली.8 / 11गेल्या सहा दिवसांत एफपीआय गुंतवणूकदारांनी भारतातून २१ हजार ३०८ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 9 / 11मार्चपासून देशात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. तेव्हापासून देशातील परकीय गुंतवणूक बाहेर जाऊ लागली आहे. 10 / 11एकट्या मार्च महिन्यात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतली. याआधी गुंतवणूकदारांनी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली गेली नव्हती.11 / 11गेल्या काही दिवसांत विविध संस्थांनी भारताच्या विकासदराबद्दलचे अंदाज वर्तवले आहेत. येत्या काळात परिस्थिती प्रतिकूल राहणार असल्याचं या अंदाजांमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे.