शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CNG-PNG आता पेट्रोल-डिझेलच्या मागावर, शंभरीच्या जवळ वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 2:21 PM

1 / 5
पेट्रोल डिझेलनं शंभरी गाठल्यानंतर अनेक लोकांनी आपला मोर्चा सीएनजी गाड्यांकडे वळवला होता. तुलनेनं स्वस्त असल्यामुळे लोक सीएनजी गाड्यांना प्राधान्य देत होते. परंतु पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीदेखील शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर पोहचलं आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
2 / 5
गेल या नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या कंपनीमुळे ही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार संचालित GAIL ने शहर गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणार्‍या नैसर्गिक वायूच्या किमती १८ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्यात वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा ताण पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
3 / 5
ग्रीन गॅस लिमिटेडनं सोमवारी लखनौमध्ये सीएनजीच्या किंमतीत ५.३ रूपये प्रति किलोची वाढ केली. लखनौमध्ये ग्रीन गॅस लिमिटेडद्वारे पुरवठा केला जात असून आता त्या ठिकाणी सीएनजी ९६.१० रूपये प्रति किलो वर पोहोचलं. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार गेल द्वारे करण्यात आलेल्या या दरवाढीनंततर कंपन्या ही दरवाढ ग्राहकांच्या खिशावर टाकू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 / 5
काही महिन्यांपूर्वी सीएनजी आणि पेट्रोल डिझेल यामध्ये खुप मोठा होता. परंतु गेल्या काही महिन्यामध्ये सातत्यानं होत असलेल्या दरवाढीमुळे यातील अंतर कमी झालं आहे. या वर्षी सीएनजीच्या किंमतीमध्ये ७४ टक्के तर मुबंईमध्ये सीएनजीच्या किंमतीत ७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, सातत्यानं सीएनजीच्या किंमतीत होत असलेल्या वाढीचा परिणाम हा गाड्यांच्या विक्रीवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
5 / 5
लखनौबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी पेट्रोलची किंमत ९६.५७ रूपये, तर डिझेलची किंमत ८९ .७६ रूपये प्रति लिटर इतकी आहे. ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी सीएनजीची किंमत ९६.१० रूपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, लखनौमध्ये आता सीएनजी आणि पेट्रोलच्या किंमतीत ५० पैशांपेक्षाही कमी फरक राहिला आहे, तर सीएनजीच्या किंमतीनं डिझेललाही मागे टाकलं आहे.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल