बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी, खरेदी केली २,४२,००० एकर शेतजमीन
By बाळकृष्ण परब | Updated: January 16, 2021 17:32 IST
1 / 6मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत असलेले बिल गेट्स आता अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी बनले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात शेतजमीन खरेदी केली आहे. 2 / 6डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार बिल गेट्स यांनी अमेरिकेतील १८ राज्यांमध्ये एकूण दोन लाख ४२ हजार एकर जमीन खरेदी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतजमीन खरेदी केल्यानंतर बिल गेट्स हे अमेरिकेत शेतजमिनीचे सर्वात मोठे मालक बनले आहेत. 3 / 6डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार बिल गेट्स यांनी अमेरिकेतील १८ राज्यांमध्ये एकूण दोन लाख ४२ हजार एकर जमीन खरेदी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतजमीन खरेदी केल्यानंतर बिल गेट्स हे अमेरिकेत शेतजमिनीचे सर्वात मोठे मालक बनले आहेत. 4 / 6६५ वर्षांच्या बिल गेट्स यांनी अमेरिकेतील लुसियानामध्ये ६९ हजार एकर, अर्कंससमध्ये ४८ हजार एकर, अॅरिझोनामध्ये २५ हजार एकर शेतजमीन खरेदी केली आहे. मात्र गेट्स यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतजमीन का खरेदी केली आहे याबाबतची माहिती समोर आलेली नाही. 5 / 6बिल गेट्स यांनी ही जमीन थेटपणे, तसेच पर्सनल इन्व्हेस्टमेंट एन्टिटी कास्केड इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिल गेट्स यांनी २०१८ मध्ये त्यांचे गृहराज्य असलेल्या वॉशिंग्टनमध्ये १६ हजार एकर जमीन खरेदी केली होती. यामध्ये हॉर्स हेवन हिल्स क्षेत्रातील १४ हजार ५०० एकर जमिनीचा समावेश आहे. ही जमीन त्यांनी १२५१ कोटी रुपयांना खरेदी केली होती. हा त्या वर्षी झालेला जमिनीचा सर्वात महाग व्यवहार ठरला होता. 6 / 6दरम्यान २००८ मध्ये बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने आफ्रिका आणि जगातील अन्य विसनशील देशांत छोट्या शेतकऱ्यांना धान्य उत्पादन आमि त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत व्हावी, यासाठी २२३८ कोटी रुपयांची मदत देत असल्याचे सांगितले होते. छोटे शेतकरी उपासमार आणि गरिबीच्या चक्रातून बाहेर यावेत, यासाठी ही मदत करण्यात येत असल्याचे सांगितले होते.