तुम्ही नोकरी बदलल्यानंतर पॉलिसीचा असा घ्या फायदा...ही माहिती ठरेल खूपच फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 12:02 IST
1 / 6नोकरी बदलली अथवा काही काळासाठी ब्रेक घेतला असेल तर समूह आरोग्य विमा (ग्रुप हेल्थ कव्हर) संपून जाते. मात्र, समूह विमा पॉलिसी वैयक्तिक विमा योजनेत हस्तांतरित करून हे संरक्षण पुढे चालू ठेवता येते. 2 / 6इरडाच्या नियमानुसार, समूह आरोग्य विमा पॉलिसी वैयक्तिक पॉलिसीत हस्तांतरित करून घेतल्यास सामूहिक विमा संरक्षण हस्तांतरित होतेच त्याबरोबरच प्रतीक्षा कालावधीचे लाभही हस्तांतरित होतात.3 / 6नोकरीच्या शेवटच्या दिवसाच्या किमान ४५ दिवस आधी पॉलिसी पोर्ट करण्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज करा. सामूहिक पॉलिसी वैयक्तिक पॉलिसीत हस्तांतरित करू इच्छिता याची माहिती कंपनीला नोकरी सोडल्यानंतर ५ दिवसांपर्यंत देऊ शकता.4 / 6नवी पॉलिसी जारी करण्यापूर्वी विमा कंपनी अतिरिक्त दस्तावेज अथवा माहिती मागू शकते. ती तुम्हाला द्यावी लागेल. वैयक्तिक पॉलिसी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार कंपनीला आहेत.5 / 6प्रतीक्षा कालावधीतून मुक्तता, तुम्ही कधीही क्लेम करू शकता. नव्या पॉलिसीत प्रतीक्षा कालावधी ३० दिवस ते ४८ महिन्यांचा असतो.6 / 6 नव्या पॉलिसीत उपचाराचा प्रतीक्षा कालावधी समूह पॉलिसीपेक्षा अधिक असेल, तर पोटिंगच्या वेळी त्याची माहिती देणे कंपनीला बंधनकारक असते.