शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील

By जयदीप दाभोळकर | Updated: May 5, 2025 09:19 IST

1 / 6
जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल, पण तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल तर पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. या एफडीच्या माध्यमातून तुम्ही तुमची गुंतवणूक ३ पटीनं सहज वाढवू शकता.
2 / 6
पोस्ट ऑफिस एफडी योजना १, २, ३ आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी चालवल्या जातात. रक्कम तिप्पट करण्यासाठी तुम्हाला ५ वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे. इन्कम टॅक्स अॅक्ट ८० सी अंतर्गत तुम्हाला टॅक्स बेनिफिट्सही मिळतात.
3 / 6
५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी ही एफडी वाढवावी लागते. हे एक्सटेन्शन तुम्हाला सलग २ वेळा करावं लागेल म्हणजेच तुम्हाला ही एफडी १५ वर्षे चालवावी लागेल. जर तुम्ही या एफडीमध्ये ५ लाख रुपये गुंतवले तर ७.५ टक्के व्याजदरानं तुम्हाला ५ वर्षात या रकमेवर २,२४,९७४ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे एकूण रक्कम ७,२४,९७४ रुपये होईल.
4 / 6
पण जर तुम्ही या योजनेला ५ वर्षांसाठी मुदतवाढ दिली तर १० वर्षात तुम्हाला फक्त व्याज म्हणून ५,५१,१७५ रुपये मिळतील आणि १० वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम १०,५१,१७५ रुपये होईल. ते मॅच्युअर होण्यापूर्वी आपल्याला ते आणखी एकदा वाढवावं लागेल.
5 / 6
१५ व्या वर्षी तुम्हाला ५ लाखांच्या गुंतवणुकीवर फक्त व्याज म्हणून १०,२४,१४९ रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला १५,२४,१४९ रुपये मिळतील. अशा प्रकारे तुमची जमा झालेली रक्कम तिप्पट करून परत केली जाईल.
6 / 6
१ वर्षाच्या पोस्ट ऑफिस एफडीला मॅच्युरिटीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत, मॅच्युरिटी पीरियडच्या १२ महिन्यांच्या आत २ वर्षांच्या एफडीला आणि मॅच्युरिटी पीरियडच्या १८ महिन्यांच्या आत ३ आणि ५ वर्षांच्या एफडीला मुदतवाढ दिली जाऊ शकते. याशिवाय खातं उघडताना मॅच्युरिटीनंतर अकाऊंट एक्सटेन्शनची विनंतीही करू शकता. मुदतपूर्तीच्या दिवशी संबंधित टीडी खात्यावर लागू होणारा व्याजदर वाढीव कालावधीसाठी लागू असेल.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक