Airtel चा प्रिमिअम प्लॅन, ५०० जीबी डेटासह मोफत कॉलिंग आणि बरंच काही
By जयदीप दाभोळकर | Updated: January 12, 2021 11:38 IST
1 / 10दूरसंचार क्षेत्रात सुरू असलेल्या स्पर्धेचा फायदा अनेकदा ग्राहकांना मिळताना दिसतो. रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियासारख्या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवेनवे प्लॅन्स बाजारात आणताना दिसत आहेत.2 / 10जिओच्या पोस्टपेड प्लॅन्सना टक्कर देण्यासाठी एअरटेलनंदेखील ३९९ रूपयांपासून १,५९९ रूपयांपर्यंतचे पोस्टपेड प्लॅन्स आणले आहेत. 3 / 10१,५९९ रूपयांचा पोस्टपेड प्लॅड एअरटेलचा सर्वात प्रिमिअम पोस्टपेड प्लॅन्सपैकी एक आहे. यामध्ये दर महिन्याला अनलिमिटेड डेटाचा (५०० जीबी हायस्पीड) फायदा मिळतो. 4 / 10याव्यतिरिक्त या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात येते. तसंच यासोबत इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्सवर १० टक्क्यांची सूट आणि अन्य फायदेही देण्यात येतात.5 / 10परंतु हा फॅमिली पोस्टपेट प्लॅन जसं की ७४९ रूपये किंवा ९९९ रूपयांसारखा नाही. जाणून घेऊया १,५९९ रूपयांच्या या प्रिमिअम प्लॅनबद्दल.6 / 10एअरटेलच्या १,५९९ रूपयांच्या पोस्टपेड प्लॅनसह देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि २०० जीबी पर्यंत रोलओव्हरसह ५०० जीबी हायस्पीड डेटा देण्यात येतो.7 / 10याव्यतिरिक्त हा डेटा संपल्यानंतर ग्राहकाला २ पैसे प्रति जीबी चार्ज करण्यात येतात. याव्यतिरिक्त ग्राहकांना २०० आयएसडी मिनिटांसह इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनवरही १० टक्क्यांची सूट देण्यात येते. 8 / 10एअरटेलचे इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स ४९९ रूपयांपासून सुरू होतात. 9 / 10यासह कंपनी एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप, हँडसेट प्रोटेक्शन, शॉ अॅकॅडमी लाईफटाईम अॅक्सेस, एअरटेल एक्स्ट्रिम अॅप मेंबरशीप, विंक म्युझीक मेंबरशीप आणि अन्य काही बेनिफिट्स दिले जातात. 10 / 10एअरटेलच्या या प्लॅनसह ओटीटी प्लॅटफॉर्म जसं नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार सारख्या अॅप्सचं सबस्क्रिप्शन देण्यात येत नाही. ज्या ग्राहकांचा डेटा युसेज अधिक असेल त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे.