रकुलप्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर धूम, पॉकेट मनीसाठी केला होता पहिला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 05:16 PM2020-05-01T17:16:23+5:302020-05-01T18:11:24+5:30

पहिला चित्रपट तिने केवळ पॉकेट मनीसाठी केला होता.

साऊथमध्ये आपल्या जलवा दाखवल्यानंतर अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय.

'दे दे प्यार दे' सिनेमात रकुल प्रीत सिंग अजय देवगणसोबत रोमान्स करताना दिसली होती.

‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

यानंतर ती ‘अय्यारी’ या सिनेमात झळकली होती. शेवटची रकुल मरजावाँ सिनेमात दिसली होती.

साऊथच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.

रकुल पंजाबी असल्याने दक्षिणेत काम करणे तिच्यासाठी सोपे नव्हते.

पण सुरुवातीच्या काळात तिने अक्षरशः संवाद तोंडपाठ करायची

पहिला चित्रपट तिने केवळ पॉकेट मनीसाठी केला होता.

पण या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तिला अनेक ऑफर मिळायला लागल्या आणि आता तर तिने दक्षिणेत अनेक चित्रपट केले आहे.

आता ती दाक्षिणात्य भाषा देखील शिकत असल्याचे मुलाखती दरम्यान सांगितली.