खऱ्या आयुष्यात नायक असलेल्या सोनू सूदचे हे बालपणीचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:50 PM2020-06-04T17:50:52+5:302020-06-04T18:01:40+5:30

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले.

सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय.

सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो नायक बनला आहे.

सोनू आज कामानिमित्त मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पंजाबचा आहे.

सोनूने त्याच्या करियरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे केली आहे.

सोनू आणि महाराष्ट्राचे देखील खास नाते आहे. सोनूने त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण नागपूरमधून पूर्ण केले आहे.

सोनूने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असले तरी त्याला अभिनयक्षेत्रात करियर करायचे होते. त्यामुळे त्याने मुंबईत अनेक वर्षं स्ट्रगल केला.

सोनूने आज बॉलिवूडमध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.