By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 09:21 IST
1 / 11१५ डिसेंबर २०२४ रोजी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. सूर्याचे हे सन २०२४ या वर्षातील शेवटचे राशीपरिवर्तन असणार आहे. सूर्याच्या धनु राशीतील प्रवेशामुळे खरमास सुरू होतील. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये खरमासाला विशेष महत्त्व आहे. 2 / 11सूर्य हा आत्मा, आदर आणि यशाचे प्रतीक मानले जाते. सूर्य सुमारे महिनाभर एका राशीत विराजमान असतो. सूर्याच्या या संक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. सूर्याच्या धनु राशीतील प्रवेशानंतर धनु संक्रांती सुरू होईल. पुढील महिन्याभराचा काळ धनु संक्रांती म्हणून ओळखला जाईल.3 / 11१४ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्राती आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सन २०२४ वर्षाची सांगता होताना आणि २०२५ वर्षाची सुरुवात होताना अनेक राशींना सूर्यकृपेने खूप काही प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...4 / 11मेष: अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. या काळात घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याची संधी मिळू शकते. धार्मिक कार्यात आवड वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरी करत आहेत त्यांनाही विशेष लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीतून अपेक्षित नफा मिळू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील. आत्मविश्वास वाढेल. चांगली बातमी मिळू शकते. 5 / 11मिथुन: अनेक फायदे देतील. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनातील समस्या संपतील. आर्थिक अडचणी कमी होतील. विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी होईल. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. क्षमतेच्या जोरावर यश मिळवू शकता. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.6 / 11सिंह: पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सुधारतील. कुटुंबासोबत सहलीच्या योजना आखू शकाल. शक्यता राहील. मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. भावंडांच्या नात्यात गोडवा येईल. संपत्तीचा लाभ मिळेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. बंपर नफा मिळू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होतील. परीक्षेत यश मिळू शकेल. हा काळ आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. आर्थिक लाभ होईल.7 / 11तूळ: सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होऊ शकेल. मुलांचा चांगला विकास होईल. मन खूप प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्वतःचा व्यवसाय चालवणाऱ्यांना विशेष लाभ मिळतील. प्रयत्नात प्रगती कराल. समाजात एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख होईल. कुटुंबातील सदस्य साथ देतील. सुख आणि शांतता लाभू शकेल.8 / 11वृश्चिक: हा काळ सुखाचा असेल. कुटुंब आणि वैवाहिक जोडीदारामधील संबंध दृढ होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाइन काम करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. व्यवसायात लाभ होईल. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतील. प्रवास आणि इन्टेंसिव्हद्वारे पैसे कमवू शकतात. भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायात पुरेसे पैसे कमवू शकता.9 / 11धनु: नशिबाची साथ मिळेल. कामे सहजतेने पूर्ण करू शकाल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. कामाने अधिकाऱ्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होऊ शकाल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नफा कमावण्याची संधी मिळू शकेल. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता. परस्पर समंजसपणामुळे नाते अधिक घट्ट होईल. महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित कराल.10 / 11मीन: आर्थिक लाभ होईल. घर किंवा जमीन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. भविष्याची योजना कराल. नोकरी करत असाल तर प्रमोशन मिळू शकते. बचत करू शकाल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. समाजात सन्मान वाढेल. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. पुरेसा पैसा मिळू शकेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वतःचे घर किंवा फ्लॅट मिळण्याची स्थिती येऊ शकेल. सहकाऱ्यांना मागे टाकून पुढे जाऊ शकाल. स्थान आणि प्रभाव वाढेल.11 / 11- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.