1 / 10मारुती सुझुकीच्या नवीन विटारा लाँचची तयारी सुरू झाली आहे. कंपनी 20 जुलै रोजी ही SUV लाँच करणार आहे. ही कार जागतिक स्तरावर लाँच होईल असे मानले जात आहे. विटारा ब्रेझा या नावाने येणाऱ्या जुन्या मॉडेल्सना ती रिप्लेस करणार आहे. कंपनीने 30 जून रोजी ऑल न्यू ब्रेझा लॉन्च केला आहे. आता न्यू विटाराशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. (फोटो क्रेडिट: Power Racer)2 / 10सांगायचे तर हा व्हिडिओ सुमारे 7 महिने जुना आहे. पॉवर रेसर नावाच्या YouTuber ने ते अपलोड केले होते. नवीन विटारा हायब्रीड इंजिनसह येण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, त्याचे अनेक फीचर्स Toyota Highrider SUV सारखी असण्याची शक्यता आहे. आपण नवीन विटाराचे काही फोटो पाहणार आहोत. 3 / 10मारुतीची नवीन विटारा टोयोटा हायरायडरच्या प्लॅटफॉर्मवर तयार केली असण्याची शक्यता आहे. परंतु एक्सटिरिअरच्या बाबतीत ती निराळी असू शकते. यामध्ये फ्रन्ट एन्ड आणि रिअर डिझाईन निराळं असेल. 4 / 10याच्या फ्रन्टला नवीन डिझाईन असलेलं ग्रिलही मिळणार आहे. ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही मोठीही असेल. याची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोस यांच्याशी होईल, असंही म्हटलं जातंय.5 / 10विटारचे इंटिरिअरदेखील नवीन अपहोल्स्ट्रीसह पूर्णपणे पुन्हा डिझाइन केले गेले आहेत. Hyryder प्रमाणे, Vitara मध्ये 9-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि हेड-अप डिस्प्ले मिळेल. Vitara UHD, व्हेंटिलेटेड सीट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखे फीचर्सही उपलब्ध असतील. 6 / 10त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ देखील दिसेल. फीचर्सच्या बाबतीत ते टोयोटा हायरायडरसारखे असू शकते. मारुतीची ही नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही असेल असे मानले जात आहे.7 / 10मारूती सुझुकीची नवी विटारा एक हायब्रिड आणि एक माईल्ड हायब्रिड इंजिनमध्ये लाँच केली जाऊ शकते. यात 1.5 लिटर K15C ड्युअलजेट पेट्रोल युनिटसह टोयोटाचं 1.5L TNGA पेट्रोल युनिट पाहायला मिळेल. 8 / 10हे माईल्ड हायब्रीड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. या एसयूव्हीला 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. या SUV चे मॅन्युअल व्हेरियंट ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टमसह दिले जाऊ शकतात.9 / 10नवीन Vitara मध्ये वायरलेस चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीटर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यासारखी स्टँडर्ड फीचर्स मिळतील. 10 / 10याशिवाय, सुरक्षेसाठी, यामध्ये मल्टिपल एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी, ईएसई, हिल होल्ड असिस्ट, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट, पार्किंग सेन्सर, 360 डिग्री कॅमेरा यासह अनेक सेफ्टी फीचर्स दिसतील. या कारची किंमत 10 लाख रूपयांपासून सुरू होऊ शकते असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.