शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात युवकांचा परभणी जिल्हा कचेरीला घेराव

By राजन मगरुळकर | Updated: October 10, 2023 17:52 IST

खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा : प्रशासनाला निवेदन

परभणी : शासनाने घेतलेल्या कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय आणि शाळांच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कंत्राटी नोकरभरती विरोधात तरुणांनी मोर्चात सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणि घेराव आंदोलन करण्यात आले. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशद्वारासमोर खा.जाधव यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम, संजय सारणीकर, अतुल सरोदे, पंढरीनाथ घुले, रावसाहेब रेंगे, झेलसिंग बावरी, सय्यद कादर, दीपक बारहाते, नितीन लोहट, रामप्रसाद रणेर, प्रदीप भालेराव, उदय देशमुख, शेख रफिक, काकडे, विकी पाष्टे, रामदेव ओझा यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी नोकर भरतीच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यानंतर शासनाच्या त्या शासन आदेशाची विद्यार्थ्यांनी होळी केली. सदरील मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

हक्काचे परत द्या, अन्यथा युवक जागा दाखवतील : खा. जाधवशाळा खासगीकरण असो की, नोकर भरती प्रक्रियेत कंत्राटी भरती या सर्व निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या धोरणाचा निषेध केला आहे. ही तर आंदोलनाची सुरुवात आहे. अजून पुढे तीव्र स्वरूपाची आंदोलने केली जातील. कोणत्याही आंदोलनाची ठिणगी ही परभणीमध्ये पडते. आणि त्याचा वनवा मुंबईत, दिल्लीत, देशात पोहोचतो. युवकांचे, तसेच सर्वसामान्यांचे हक्काचे प्रश्न सोडवा अन्यथा हेच युवक केंद्र सरकार, राज्य सरकारला आगामी काळात जागा दाखवतील. तरुणांच्या भावना या सरकारने समजून घ्याव्यात, असे आवाहन खा.संजय जाधव यांनी मार्गदर्शनप्रसंगी केले.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारparabhaniपरभणी