शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेलूच्या स्वतंत्र वीज वाहिनीचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:33 IST

सेलू शहराला सुरळीत वीज पुरवठा करणाऱ्या पाथरी येथील १३२ केव्ही वीज केंद्रातून सेलू येथील ३३ केव्ही वीज केंद्राला स्वतंत्र वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

सेलू (परभणी ) : सेलू शहराला सुरळीत वीज पुरवठा करणाऱ्या पाथरी येथील १३२ केव्ही वीज केंद्रातून सेलू येथील ३३ केव्ही वीज केंद्राला स्वतंत्र वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, हे काम काही दिवसांपासून रखडल्याने तालुक्यातील ग्राहकांना विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

सेलू येथे १३२ केव्ही वीज केंद्र नाही. त्यामुळे पाथरी येथून सेलू शहरासह गुगळी धामणगाव, डासाळा या ३३ केव्ही वीज केंद्राला वीज पुरवठा करण्यात येतो. विजेची मागणी वाढत असल्याने जुन्या वाहिनीद्वारे वीज पुरवठा करताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. इन्फ्रा योजनेतून २०१६-१७ साली सेलू ते पाथरी या सेलू शहरातील स्वतंत्र वीज वाहिनीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. वाहिनीचे काम सुरु झाल्यानंतर तीन ठिकाणी विविध कारणांमुळे काम रखडले होते. परंतु, या विभागाने शेतकऱ्यांशी चर्चा केल्याने हे काम पुन्हा सुरु झाले. मात्र पुन्हा गुगळी धामणगाव येथे वीज वाहिनीचे काम बंद पडले आहे. सेलूपर्यंत वीज वाहिनीला येण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. डासाळा येथील ३३ केव्हीपर्यंत ही वाहिनी नेण्याची गरज निर्माण झाली आहे. डासाळा येथून जुन्या लाईनद्वारे सेलूपर्यंत वीज पुरवठा केला जावू शकतो. परंतु, काम थांबल्याने महावितरणला वीज पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.

विजेच्या समस्यांना ग्राहक वैतागलेसेलू तालुक्यामध्ये स्वतंत्र १३३ केव्ही नसल्याने शहरासह तालुक्यात कमी दाबाने वीज पुरवठा होतो. परंतु, अनेकवेळा वारे व पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. उन्हाळ्यात तर विजेची मागणी वाढत असल्याने वीज पुरवठा करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्राहकांनाही वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

काम पूर्ण करण्याचा लवकरच प्रयत्नसेलू येथे जोडल्या जाणाऱ्या स्वतंत्र वीज वाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गुगळीधामणगाव येथे हे काम एका शेतकऱ्याने अडविले आहे. काम पूर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविला जाणार आहे. डासाळापर्यंत तरी लाईनचे काम झाले तरी सेलू शहराला तसेच गुगळी धामणगाव, डासाळा येथील ३३ केव्ही अंतर्गत गावांना चांगली वीज मिळेल. काम पूर्ण झाल्यानंतर ७० टक्के समस्या कमी होतील, अशी माहिती उपअभियंता राजेश मेश्राम यांनी दिली. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजparabhaniपरभणी