शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

स्टॅन्डअप इंडियामध्ये महिलांचा डंका; राज्यात ६५९८ उद्योजक महिलांना लाभ

By मारोती जुंबडे | Updated: April 14, 2023 18:53 IST

अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना सक्षम करत त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१६ पासून स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे.

परभणी: केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत राज्यभरात ५ वर्षात ६५९८ महिला उद्योजकांना व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिलांसाठी राबवली जाते. या योजनेचा ग्रामीण भागात अपेक्षित प्रचार व प्रसार झाल्या नसल्याने ग्रामीण भागातील उद्योजक महिला या स्टँड अप इंडिया योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली.

अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना सक्षम करत त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१६ पासून स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन उद्योग उभारण्यासाठी कर्ज देण्यात येते, सेवा किंवा व्यापार आणि कृषी संलग्न उद्योग क्षेत्रात ग्रीन फील्ड कंपन्या सुरू करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या महिला किंवा पुरुषाला बँकेच्या प्रत्येक शाखेतून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. तळागाळातील समाजापर्यंत उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याबरोबर त्यांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेला २०२५ पर्यंत केंद्र शासनाच्या वतीने मुद्दत वाढ देण्यात आली आहे. २०१६ ते २०२२ पर्यंत या योजनेअंतर्गत राज्यभरात ६५९८ महिलांना ११९९ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्जातून महिलांना आपला उद्योग उभारून आर्थिक सक्षम होण्यासाठी बळ मिळाले आहे.

११९९ कोटींचे मिळाले बळकेंद्र सरकारच्या मार्जिन मनी योजनेअंतर्गत पात्र अनुसूचित जाती व मागासवर्गीय घटकातील नव उद्योजक अर्जदार स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, मागासवर्गीय घटकांमधील उद्योजकांना उभारी देण्यासाठी मार्जिन मनी योजना राबवली जाते. बेरोजगार तरुणांना व्यवसायातून सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. नव उद्योजकांनी १० टक्के व सोयीचा भरणा केल्यानंतर बँकेने अर्जदारास योजनेअंतर्गत ७५ टक्के अर्ज मंजुरीनंतर १५ टक्के सबसिडी शासन देते. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत आतापर्यंत राज्यभरात ६५९८ महिलांना ११९९ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज विविध बँक शाखेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.

मुंबई पहिल्या स्थानावरकेंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी मदत करून त्यांना उभारी देण्यासाठी २०१६ पासून प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत सर्वाधिक मुंबई मध्ये १०३० त्यानंतर नागपूर ६३५, पुणे ९३४ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासनाने २३७ महिलांना स्टँड अप योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले आहे.

परभणी सापडेना लाभार्थीकेंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत महिला उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून त्यांच्या उद्योगांना उभारी देण्यासाठी ही योजना आहे. परंतु, आतापर्यंत परभणी जिल्ह्यात २५६ महिला लाभार्थ्यांची उद्दिष्ट असताना केवळ १८ महिलांना १ कोटी ९६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे अनुसूचित जाती व जमाती मधील एकही महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे परभणीत महिला लाभार्थी सापडत नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जिल्हा महिलांची संख््यामुंबई १०३०नागपूर ६३५पुणे ९३४छत्रपती संभाजीनगर २३७बिड ३२परभणी १८

टॅग्स :parabhaniपरभणीCentral Governmentकेंद्र सरकार