शहरातील प्रथम वर्ग न्यायालयात वकिली करणारे ॲड.ज्ञानेश्वर बाबुराव घुले हे १८ सप्टेंबर रोजी दुपारी २च्या सुमारास न्यायालयीन कामकाजाच्या संबंधाने न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात सहकारी वकिलांना बोलत असताना, त्यांचे पक्षकार पोलीस कर्मचारी गजभारे यांच्या पत्नी सुनीता संजय गजभारे या तेथे मुलाला घेऊन आल्या. माझ्या नवऱ्याची वकिली का घेतली, म्हणून त्यांना त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर, हातात दगड घेऊन ॲड.घुले यांना मारला, तसेच त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तू जर माझ्याविरुद्ध काही करशील, तर तुझ्याविरुद्ध विनयभंगाची व ॲट्रॉसिटीची तक्रार करील, अशी धमकीही दिली. यावेळी इतरांनी येऊन सोडवा सोडव केली. याबाबत १८ सप्टेंबर रोजी ॲड.ज्ञानेश्वर घुले यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सुनीता संजय गजभारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेची वकिलाला मारहाण, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:21 IST