शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच, पुत्र विरहात पित्यानेही केली आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:05 IST

मुलाने आत्महत्या केल्याचे पाहताच पुत्र विरहात पित्यानेही  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शहरातील सरगम कॉलनी येथे घडली आहे. 

परभणी, दि. 12 :  मुलाने आत्महत्या केल्याचे पाहताच पुत्र विरहात पित्यानेही  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शहरातील सरगम कॉलनी येथे घडली आहे. मरिबा तुकाराम गायकवाड (७५) आणि चंद्रकांत मरिबा गायकवाड (४२) असे आत्महत्या केलेल्या बाप-लेकाची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चंद्रकांत मरिबा गायकवाड हे जालना येथे राज्य राखीव पोलीस दलात स्वयंपाकी म्हणून सेवेत होते. चार दिवसांपूर्वी सुटी घेऊन ते घरी आले. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. सोमवारी रात्री त्यांना सतत खोकल्याची उबाळी येत होती, यामुळे पत्नीला बोलून ते बाजूच्या खोलीत झोपण्यास गेले. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा चंद्रकांत यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती त्यांच्या घरा शेजारी राहणा-या त्यांच्या वडिलांना समजली. तेव्हा ते चंद्रकांत  याच्या खोलीत आले, थोडा वेळ तिथेच बसून राहिले व थोड्यावेळाने घरी गेले. यानंतर काही वेळाने त्यांनीही  घरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.  

घटनेची माहिती मिळताच नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गायकवाड, उपनिरीक्षक बाबुराव गिते, जमादार शेख उस्मान, गजानन गवळी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक बाबुराव गिते, जमादार शेख उस्मान तपास करीत आहेत.