कोणाही यावे बोअरवेल घ्यावे
शहरात अधिकृतरित्या बोअरवेल घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडे अर्ज केल्यावर केवळ २०० फूटापर्यंत उपसा करण्याची परवानगी दिली जाते. मात्र, परवानगी घेऊनही अनेक ठिकाणी २०० फुटापर्यंत पाणी लागेलच अशी स्थिती नाही. यामुळे २०० फुटापेक्षा जास्त आणि ३०० फुटापर्यंत बोअरवेलचा उपसा केला जातो. यामुळे कोेणीही यावे आणि बोअरवेल घ्यावे, अशी स्थिती शहरात दिसून येते.
७ ते ८ दिवसाआड शहराला नळाद्वारे पाणीपुरवठा
शहरातील मनपाचे एकूण बोअरवेल - ७६६
शहराची एकूण लोकसंख्या - ३ लाख ५० हजार
प्रतिकुटुंब मिळते पाणी - ९० ते १०० लिटर
जलपुर्नभरण नावालाच
शहरात नागरिकांनी स्वत:हून घरोघरी जलपुर्नभरण करुन घ्यावे. यामुळे उन्हाळ्यातील जाणवणारी पाणी टंचाई कमी होऊ शकते. तसेच मनपाने ओपन स्पेस रेन वाॅटर हार्वेस्टिंग केलेल्या जागांची देखभाल दुरुस्ती केल्यास पावसाचे पाणी साठविता येऊ शकते. - सचिन देशमुख, नगरसेवक.