शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार रथावर आरटीओंचा वॉच

By admin | Updated: September 28, 2014 23:52 IST

परभणी : प्रचाररथावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची नजर राहणार असून यासाठी त्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे आदेश निवडणूक विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत.

परभणी : विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रचाररथावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची नजर राहणार असून यासाठी त्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे आदेश निवडणूक विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. आता जाहिरातबाजीला प्रचंड उधाण येणार आहे. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी वाहनांना हात, कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, रेल्वे इंजिन, कपबशी, सिलिंडर असे आकार देऊन किंवा निवडणूक उमेदवारांचे फलक लावलेली वाहने शहरातील विविध भागातून किंवा चौका-चौकातून फिरताना दिसतील. या प्रभावी प्रचार यंत्रासाठी वाहनांच्या अंतर्गत रचनेत कोणताही बदल करण्याची परवानगी नसते. मात्र वाहनाच्या बाह्य स्वरुपात मात्र बदल करता येतो. अनेक उमेदवार आपल्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे आकार वाहनांना देतात. तर काही जण वाहनांवर केवळ फलक, पोस्टर लावून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मागील निवडणुकीपर्यंत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे याकडे लक्ष नव्हते. परंतु; याकडे आता कडक कारवाई करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी दिल्या आहेत. ‘प्रचाररथ’ किंवा जाहिरात लावलेली वाहने तयार करण्यासाठी उमेदवारांना निवडणूक आयोगानंतर मोटार वाहन कायद्यानुसार आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहनाची सर्व कागदपत्रे योग्य आहेत का? वाहनाच्या बाह्य रचनेतील बदल चालकाच्या दृष्टीक्षेपात बाधा तर येत नाही ना, अशा घटकाची तपासणी आरटीओंकडून केली जाणार आहे. याबाबतचे पत्र परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओ कार्यालयांना दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता आरटीओ विभागाकडून कशी अंमलबजावणी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) वाहनांवरील जाहिरातींचे नियमव्यावसायिक वाहनांबाबत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जाहिरातीसाठी पीडीडीए या नमुन्यात अर्ज स्वीकरण्यात येतात. वाहनाच्या दोन्ही बाजुंना जाहिराती लावण्याची मुभा आहे. वाहनाच्या दर्शनी भागावर जाहिराती लावण्यास बंदी आहे. जाहिरात वाहनाच्या लांबी, रुंदी पेक्षा जास्त नसावी, जाहिरातीमुळे वाहनाचे हेडलाईट, टेललाईट, इंडिकेटर, रियरव्हयू मिरर, नंबर प्लेट आदी अच्छादित होणार नाही, याची काळजी घेतलीे पाहिजे. पक्षाचा झेंडा वाहन चालकाच्या दृष्टीसमोर नसावा. चकाकणाऱ्या, प्रकाशमान जाहिरातीवर निर्बंध व वाहनांवर ३.८ मीटर उंचीपर्यंत जाहिरात लावण्यास मंजुरी देण्यात आली आहे.