शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

परभणीत कापूस खरेदीसाठी प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST

अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांचे धाडसत्र परभणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मागील ...

अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांचे धाडसत्र

परभणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मागील १५ दिवसांपासून धाड सत्र सुरू केले आहे. ८ दिवसांत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कारवाया केल्या जात आहेत. यातून मोठ्या प्रमाणात देशी दारू, गुटखा यासह इतर मुद्देमाल जप्त केला जात आहे. या कारवायांमुळे वाळू, गुटखा, देशी दारू माफियांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.

निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

परभणी : येथील बसपोर्टसाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे या बसपोर्टचे काम सुरूही आहे. मात्र, कंत्राटदारांकडून बिलापोटी एसटी महामंडळाकडे ६० लाख रुपयांचे बिल पाठविले आहे. परंतु, हे बिल एसटी महामंडळाने अद्यापपर्यंत दिलेले नाही. त्यामुळे परभणीकरांचे स्वप्न असलेल्या बसपोर्टचे काम बंद पडले आहे. याकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

९९३ रुग्णांना रक्त पुरवठा

परभणी : जिल्ह्यामध्ये जीवन अमृत सेवा म्हणजेच ब्लड ऑन कॉल या योजनेंतर्गत १ जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ९९३ रुग्णांना ४० किमी अंतरापर्यंत रक्त पिशव्या पोहचविल्या आहेत. यामध्ये जानेवारी ११६, फेब्रुवारी ११८, मार्च १२८, एप्रिल ९२, मे ९८, जून ९५ व जुलैत ९६ बॅगा रक्त पुरवठा करण्यात आला आहे.

३०२ कोटी थकले

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन काळात सरासरीवर आधारित दिलेल्या बिलांपैकी ३ लाख ३७ हजार ६३ ग्राहकांकडे ३०२ कोटी ६३ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. ही बिले वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकी वाढत आहे.

केवळ ७२५ घरे पूर्ण

परभणी : रमाई आवास योजनेंतर्गत शहरी नगरपालिका व महानगरपालिकेंतर्गत २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ३ हजार ३५७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी केवळ ७२५ घरकुले पूर्ण झाली आहेत. अद्यापही २ हजार ६३२ घरकुले अपूर्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाने गती वाढविणे गरजेचे आहे.

सरसकट पीक विमा द्या

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आपली पिके संरक्षित केली. मात्र, नुकसान होऊनही अद्याप या शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासकीय मदत मिळाली असतानाही विमा कंपनीने मदत द्यावी.