शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

होलोग्रामअभावी रखडले मतदार ओळखपत्र वाटप

By admin | Updated: February 13, 2015 15:28 IST

मतदान ओळखपत्रासाठी आवश्यक असलेले होलोग्राम उपलब्ध न झाल्याने नव्याने मतदार यादीत समाविष्ट झालेल्या मतदारांना अजूनही मतदान ओळखपत्र वाटप झाले नाहीत.

परभणी : मतदान ओळखपत्रासाठी आवश्यक असलेले होलोग्राम उपलब्ध न झाल्याने नव्याने मतदार यादीत समाविष्ट झालेल्या मतदारांना अजूनही मतदान ओळखपत्र वाटप झाले नाहीत. त्यामुळे ओळखपत्रासाठी मतदार तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.परभणी जिल्ह्यात १ ते १६ डिसेंबर या काळात मतदार पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत घरोघर जाऊन मतदार यादीत समाविष्ट नसलेल्या तसेच नव मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्याचप्रमाणे ७ व १४ जानेवारी रोजी विशेष कॅम्प घेऊन मतदार नोंदणी करण्यात आली. तसेच ज्या मतदारांचे फोटो यादीत समाविष्ट नव्हते, अशा मतदारांचे फोटो उपलब्ध करण्यात आले. नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांची यादी २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. २५ जानेवारी रोजी जिल्हाभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या दिवशी नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान ओळखपत्र वितरित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले. प्रातिनिधीक स्वरुपात निवडक मतदारांचे ओळखपत्र कार्यक्रमात वाटप करण्यात आले. परंतु उर्वरित मतदारांना अद्यापपर्यंत ओळखपत्र प्राप्त झाले नाहीत.ओळखपत्र बनविण्यासाठी प्लास्टीकचे पाऊच आणि शासनाच्या होलोग्रामची आवश्यकता असते. परंतु निवडणूक विभागाकडून होलोग्राम उपलब्ध झाले नसल्याने अजूनही ओळखपत्र तयार झाले नाहीत. परिणामी नवीन मतदार ओळखपत्रांसाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. परभणीसह अन्य विधानसभा मतदार संघातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे./(प्रतिनिधी)

होलोग्रामची केली मागणीया संदर्भात तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता, होलोग्राम नसल्याने ओळखपत्र तयार करता आले नाहीत. शिक्के मारुन मतदार कार्ड तयार करुन ठेवले आहेत. निवडणूक विभागाकडे होलोग्रामची मागणी केली असून, ते उपलब्ध झाल्यास मतदारांना मतदान ओळखपत्र वाटप होतील, असे सांगण्यात आले.

 ■ परभणी विधानसभा मतदार संघात मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात १३ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. या मतदार संघात ८ हजार ६४९ नवीन मतदारांची नोंदणी झाली तर नावातील दुरुस्ती असलेले ४ हजार ५१४ मतदार आहेत. ४0८ मतदार एका भागातून दुसर्‍या भागात स्थलांतरित झालेले आहे. या सर्व मतदारांना नव्याने ओळखपत्र वितरित करावयाचे आहेत.