शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Results :'एमएनसी'तील नोकरी सोडली; चुकांमधून शिकला, यू-ट्युबचा आधार घेतला अन् जिंकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 20:26 IST

परभणी येथील स्रेहशारदानगर भागातील रहिवासी असलेले कुणाल मोतीराम चव्हाण युपीएससी परीक्षेत २११ व्या रँकने उत्तीर्ण

ठळक मुद्देयुपीएससीतील गुणवंत कुणाल चव्हाण यांची यशोगाथा

परभणी : अत्यंत बारकाईने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. एका वेळी झालेली चूक पुन्हा न करणे आणि त्या चुकांमधून शिकत गेलो आणि त्यातूनच हे यश मिळविले, असे युपीएससी परीक्षेत २११ व्या रँकने उत्तीर्ण झालेल्या कुणाल मोतीराम चव्हाण यांनी सांगितले.

परभणी येथील स्रेहशारदानगर भागातील रहिवासी असलेले कुणाल मोतीराम चव्हाण यांचे शालेय शिक्षण गांधी विद्यालय एकतानगर शाखेतून झाले. दहावी परीक्षेत यश संपादन केल्यानंतर लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुणे येथे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये बी.टेकची पदवी प्राप्त केली. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेंगलोर येथील बॉश कंपनीत अडीच वर्षे नोकरी केली. 

ही नोकरी करीत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू केली होती. मुंबई येथे एसआयएसी संस्थेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. याच दरम्यान २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. त्यानंतर दिल्ली येथे जाऊन या परीक्षेच्या तयारी लागलो. याच दरम्यान हैदराबाद येथे एम्प्लॉईज प्रोव्हीडंट फंड आॅर्गनायझेशनमध्ये अकाऊंट आॅफीसर म्हणून रुजू झालो तर दुसरीकडे परीक्षेची तयारीही सुरू होती. युपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना युट्युब व्हीडिओचा मोठा फायदा झाला. युट्यूबच्या साह्याने व्हीडीओवरुन स्वत:च्या नोटस् तयार केल्या. या नोटस्चा आधार घेऊन परीक्षेची तयारी केली आणि या परीक्षेत यश संपादन केले, असे कुणाल चव्हाण यांनी सांगितले.

ध्येय निश्चित करुन विद्यार्थ्यांनी तयारी करावीविद्यार्थ्यांनी सुरुवातीला स्वत:तील क्षमता ओळखाव्यात. त्यानंतर ध्येय निश्चित करावे. काही तरी वेगळे करुन दाखवण्याचे ध्येय समोर ठेवून तयारी करावी. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर दिला पाहिजे. चुकांमधून शिकत गेले पाहिजे. झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सोर्सेस लिमिटेड वापरा; मात्र ते योग्य पद्धतीने निवडा. यु ट्युबवर स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे अनेक व्हिडीओज् आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, त्यांच्यासाठी यु-ट्यूबच गुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:चे कन्सेप्ट क्लिअर करुन सातत्यपूर्ण तयारी केल्यास यश निश्चित मिळेल, असे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगparabhaniपरभणी