शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नरसी मूकबधीर शाळेची मान्यता रद्द

By admin | Updated: January 29, 2015 15:05 IST

नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेची मान्यता २८ जानेवारीपासून रद्द करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी दिले आहेत.

अनुराग पोवळे ल्ल /नांदेडनरसी येथील निवासी मूकबधीर शाळेची मान्यता २८ जानेवारीपासून रद्द करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी दिले आहेत. वैद्य यांनी २७ रोजी सदर शाळेला भेट दिली होती. तसेच या शाळेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव जि. प. समाजकल्याण विभागाने पाठविला होता.नरसी येथील या निवासी मूकबधीर शाळेत एका सहावीत शिकणार्‍या मतीमंद मुलीवर शाळेत कार्यरत ३ शिपायांसह अन्य २ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरापासून अत्याचार केला होता. ही बाब पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर उघडकीस आली होती. याप्रकरणी २४ जानेवारी रोजी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या गंभीर प्रकाराची दखल घेत नांदेड जि. प. समाजकल्याण विभागाने जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ, सावरगाव पीर ता. मुखेड संचलित नरसीतील सदर शाळेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्या अहवालानुसार सदर शाळेची मान्यता २८ जानेवारी २0१४ पासून काढण्यात आली आहे. या शाळेतील चंद्रकांत संभाजी बरमे, देवीदास पिकले आणि मुजीब शहाजीर या कर्मचार्‍यांविरूद्ध तसेच शाळेतीलच अन्य दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मान्यता काढल्यामुळे या शाळेतील मुलांची यादी करून दुसर्‍या शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही नांदेड जि. प. समाजकल्याण विभागाला दिल्या आहेत. तसेच या संस्थेशी कोणताही प्रशासकीय अथवा आर्थिक व्यवहार आपल्या स्तरावरून करू नये अशी सूचना दिली आहे. दरम्यान, या गंभीर घटनेमुळे जिल्ह्यातील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 ■ या शाळेची मान्यता काढताना समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक आयुक्तांनी अनेक गंभीर बाबी पुढे आणल्या आहेत. त्यात सदर शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी त्यातील डाटा मात्र नष्ट केल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे सदर प्रकरण १ वर्षापासून चालू असताना शाळेच्या संस्थाचालकांनी सुरक्षा विषयक बाबीची दखल घेतली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. समाजकल्याण विभागाने वारंवार सूचना देवूनही मुलींच्या संरक्षणासाठी महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती केली नाही आणि मुलींचे संगोपन करण्यास सदर संस्था अकार्यक्षम असून शाळेची इमारतही योग्य नसल्याचे कारण दिले आहे.

 केवळ चार दिवसांत कारवाईचा बडगानरसी येथील निवासी मूकबधीर विद्यालयात जवळपास वर्षभरापासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार २४ जानेवारी रोजी उघडकीस आला होता. लोकमतने या घटनेतील अनेक बाबी पुढे आणल्या. शनिवारीच समाजकल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मारोती जाधवर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच पीडित मुलीशीही चर्चा केली. २६ जानेवारी रोजी रविवारी समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी पीडित मुलीची भेट घेतली. तर २७ जानेवारी रोजी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनीही घटनस्थळावर जावून माहिती घेतली. २८ जानेवारीपासूनच शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेशही धडकले आहेत.