गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरटे सक्रिय झाल्याने दुचाकी चालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मन्नाथनगर परिसरातील रहिवासी मीनाबाई बळीराम मुंडे यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी क्रमांक एम. एच. २२, ए. एल. ५०८२ ही २५ फेब्रुवारी रोजीच्या रात्री १० ते २६ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास हँडल लॉक तोडून चोरट्यांनी लंपास केली, अशी फिर्याद मीनाबाई बळीराम मुंडे रा. बडवणी ता. गंगाखेड ह. मु. मन्नाथनगर गंगाखेड यांनी दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार मदन सावंत करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गंगाखेड शहर व परिसरात दुचाकी चोरटे सक्रिय झाल्याने दुचाकी चालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अज्ञात चोरट्यांनी पळविली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST