शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाºयाकडून मागविला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:45 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दात्याचे रक्तदान करून न घेतल्या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाºयाकडून प्रशासनाने खुलासा मागविला आहे़ ‘लोकमत’ने हे प्रकरण समोर आणल्यानंतर आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दात्याचे रक्तदान करून न घेतल्या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाºयाकडून प्रशासनाने खुलासा मागविला आहे़ ‘लोकमत’ने हे प्रकरण समोर आणल्यानंतर आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे़येथील डॉ़ पवन चांडक हे १३ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या मित्रासमवेत रक्तदान करण्यासाठी गेले होते़ विशेष म्हणजे स्वइच्छेने रक्तदान करण्याची त्यांनी तयारी केली होती़ डॉ़ पवन चांडक रक्तपेढीमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचाºयाने रक्तदान करून घेण्यास टाळाटाळ केली़ या प्रकारानंतर डॉ़ चांडक यांनी आपले सरकार पोर्टलवर स्वत:चे अनुभव कथन केले़ डॉ़ चांडक यांच्या या तक्रारीची दखल घेत आपले सरकार पोर्टलवरून संबंधितांकडून या प्रकरणी खुलासा मागविला होता़ जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा प्रकार समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने १७ आॅक्टोबरच्या अंकात ‘प्रति जैविक औषधींचा तुटवडा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले़त्यात डॉ़ चांडक यांना रक्तदान करण्यासाठी आलेल्या अडचणीही मांडल्या होत्या़ या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने कर्मचाºयाकडून या विषयीचा खुलासा मागविला आहे़ त्यामुळे या कर्मचाºयाविरूद्ध प्रशासन आता काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़रक्ताचा तुटवडा असतानाही उदासिनताजिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे़ दररोज हजारो रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात़ अशा वेळी रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा असणे आवश्यक आहे़ रक्तपेढीच्या वतीने वेळोवेळी निवेदने काढून जिल्हा रुग्णालयात रक्तसाठा कमी असल्याचे सांगत रक्तदात्यांना आवाहन केले जाते़ मात्र स्वच्छेने येणाºया रक्तदात्यांनाच योग्य वागणूक मिळत नसल्याचे दिसून आले आहे़ डॉ़ पवन चांडक हे दरवर्षी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून गरजू रुग्णांसाठी रक्तदान करतात़ आतापर्यंत त्यांनी २२ वेळा रक्तदान केले आहे़ रक्तपेढीत रक्ताचा साठा उपलब्ध नसताना येणाºया प्रत्येक रक्तदात्याला अस्थेवाईक वागणूक देणे आवश्यक होते़ मात्र स्वत:हून दाते रुग्णालयात येवून रक्तदान करण्यास तयार असताना त्यांचे रक्तदान होत नसेल तर रुग्णालयातील रक्तसाठ्यात वाढ होणार कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे़ तसेच रक्तही अत्यावश्यक बाब असून, रक्तसाठा वाढविण्यासाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे़ मात्र केवळ उदासिन भूमिकेमुळे जिल्हा रुग्णालयातील रक्तसाठ्यात वाढ होत नसल्याचे दिसत आहे़