शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेलूत आणखी दोघांची दुचाकी चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

सेलू शहरातील आदर्शनगर भागातील सुयश अशोकराव पटवारी यांनी त्यांची एमएच- २२ एएच- ५२९७ क्रमांकाची दुचाकी ४ एप्रिल रोजी सायंकाळी ...

सेलू शहरातील आदर्शनगर भागातील सुयश अशोकराव पटवारी यांनी त्यांची एमएच- २२ एएच- ५२९७ क्रमांकाची दुचाकी ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घराबाहेर उभी केली होती. अर्ध्या तासानंतर घराबाहेर आल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी दुचाकीचा इतरत्र शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी सेलू पोलीस ठाण्यात २३ एप्रिल रोजी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना शहरातील सरोदेनगर भागात घडली. येथील ज्ञानदेव काशीनाथराव उबाळे यांनी त्यांची एमएच- २२ एक्यू- ५३५२ क्रमांकाची दुचाकी २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घराबाहेर उभी केली होती. दोन तासांनंतर ते घराबाहेर आले असता त्यांना जागेवर दुचाकी दिसून आली नाही. शोधाशोध करूनही ती सापडली नाही. याबाबत त्यांनी २२ एप्रिल रोजी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ३ दिवसांपूर्वीच शहरात ३ दुचाकी चोरीस गेल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली होती. आता पुन्हा दोन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. असे असताना पोलीस मात्र चोरट्यांना अद्याप पकडू शकले नाहीत.