शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील नागरी भागात दोन दिवसांची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:31 IST

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ...

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ मार्चच्या सकाळी ६ वाजेपर्यंत परभणी महानगरपालिका क्षेत्र व ५ किमीचा परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगर पंचायती आणि परिसरातील ३ किमीचा परिसर या भागात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी व त्यांची वाहने, शासकीय, खासगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, लसीकरण केंद्र तपासणी केंद्र, वैद्यकीय आपत्कालीन व त्यासंबंधी सेवा, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेले व्यक्ती व वाहने, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक कर्मचारी व त्यांची वाहने, गल्ली, कॉलनी व सोसायटी आदी भागांमध्ये दूध विक्री करणारे विक्रेते, कोरोना लसीकरण केलेल्या व्यक्ती व लसीकरणासाठी जात असलेल्या व्यक्ती, परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी, परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस यांना या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. संचार बंदीचे उल्लंघन करून कोणतीही व्यक्ती किंवा वाहने बाजारांमध्ये गल्लीमध्ये, घराबाहेर, फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात आढळलेले कोरोना बाधित

दिनांक : बाधित : मृत्यू

८ मार्च : २० : ००

९ मार्च : १९ : ०३

१० मार्च : ५९ :०३

११ मार्च : ७९ : ०२

१२ मार्च : ८२ : ०१