शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

दुधना प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 13:30 IST

Dudhna project News : जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होते.

ठळक मुद्देराजवाडी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वालूरची वाहतूक बंद आहे. मोरेगाव येथील पुलावरून काही प्रमाणात पाणी वाहत आहे.

सेलू ( परभणी ) :  निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दुपार पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने सुरू असून प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडून नदीपाञात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. ( Twelve doors of the Dudhna project opened ) 

जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होते. प्रकल्पात अगोदरच ८४.१३ टक्के पाणी साठा आहे. बुधवारी दुपारी आणि रात्री ही पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी येत असून पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने बुधवारी रात्री ८ वाजता चार तर राञी पुन्हा आठ असे बारा दरवाजे उघडले आहेत. व्दार क्र १,२,३,४,५,६, १५,१६,१७,१८,१९,२० हे ०.३० मीटरने उचलून १२हजार ४९२ क्युसेसने पाण्याचा नदीपाञात विसर्ग केला जात आहे. 

मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे राजवाडी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वालूरची वाहतूक बंद आहे. तसेच मोरेगाव येथील पुलावरून काही प्रमाणात पाणी वाहत आहे. सद्यस्थितीत मोरेगाव येथील वाहतूक सुरळीत झाली असलीतरी रात्री वाहतूक बंद झाली होती. 

टॅग्स :parabhaniपरभणीfloodपूरRainपाऊस