ग्रामीण भागातून वाढल्या तक्रारी
सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातच रेशन दुकानांवर लाभार्थ्यांची मोठी गर्दी असते. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांतही नियमितपणे तूर डाळीचे वाटप झाले नाही. काही भागांत तूर डाळीऐवजी इतर धान्य देण्यात आले. खुल्या बाजारपेठेत तूरडाळीचे दर अधिक असल्याने तूरडाळ वितरित करण्याऐवजी तांदूळ किंवा गहू लाभार्थ्यांना बळजबरीने देण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत.
गहू, तांदळाचे वाटप
गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रेशन दुकानांतून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये गहू, तांदूळ, तेल, साखर आणि डाळ या अन्नधान्याचा समावेश आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून इतर अन्नधान्यांचा पुरवठा जवळपास बंद झाला आहे. सद्यस्थितीला केवळ गहू आणि तांदळाचेच वितरण केले जात आहे. शासनाने नियमितपणे गहू, तांदूळ, तेल आणि डाळींचा पुरवठा रेशन दुकानांवरून करावा, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे.
अंत्योदय योजना
१०,५४०७२
रास्त भाव दुकाने
११८३
एपीएल शेतकरी
२,९९०९२