शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:25 IST

सकाळी ८:४५ चा थरार! मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.

हिंगोली/परभणी/नांदेड: मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना शनिवारी (११ एप्रिल) सकाळी ८:४५ ते ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यात धक्के बसताच नागरिक घराबाहेर पडले. त्यानंतर लगेचच परभणी शहर व जिल्ह्याच्या काही भागांत आणि नांदेड जिल्ह्यातही जमिनीला कंप जाणवल्याने काही काळ घबराट पसरली होती.​एकाच वेळी तीन जिल्ह्यांत कंपहिंगोली जिल्ह्याला ८:४५ वाजता पहिला धक्का बसला, तर त्याच्या एका मिनिटानंतर म्हणजेच ८:४६ वाजता परभणी आणि नांदेड जिल्ह्यालाही भूकंपाची जाणीव झाली. सकाळी कामाच्या गडबडीत असतानाच अचानक खिडक्या आणि घरातील भांडी वाजू लागल्याने नागरिकांना भूकंपाची खात्री पटली. विशेषतः वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात गेल्या अनेक दिवसांपासून हे सत्र सुरू असल्याने ग्रामीण भागात मोठी दहशत पाहायला मिळत आहे.

​जीवितहानी नाही, प्रशासन सतर्कप्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. मात्र, वारंवार बसणाऱ्या या धक्क्यांमुळे घरांना तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेडचे जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Shaken: Mild Earthquake Jolts Hingoli, Parbhani, Nanded; People Flee Homes

Web Summary : Hingoli, Parbhani, and Nanded experienced mild earthquake tremors early Saturday. Residents rushed outdoors as tremors hit Hingoli, Parbhani, and Nanded districts. No casualties reported, but administration is on alert and advises against panic.
टॅग्स :parabhaniपरभणीEarthquakeभूकंपNandedनांदेड