शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू संशयितावर परभणीत उपचार सुरू

By admin | Updated: February 12, 2015 13:48 IST

शहरातील एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याबाबतचा संशय खाजगी रुग्णालयात आल्याने त्या रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

परभणी : शहरातील एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याबाबतचा संशय खाजगी रुग्णालयात आल्याने त्या रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संशयित रुग्णाचे घशातील स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कालिदास चौधरी यांनी दिली. शहरातील एका रुग्णास गेल्या काही दिवसांपासून सर्दी, डोके दुखण्याचा त्रास होत होता. याबाबत त्या रुग्णाने खाजगी दवाखान्यात औषधोपचार घेतला. मात्र संबंधित रुग्णास डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचे सांगितले. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास हा रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर संसर्गजन्य कक्षामध्ये दोन दिवस उपचार करण्यात आले. यामध्ये १0 रोजी रुग्णाची श्‍वसनाची तपासणी, ब्राँकाईटीस, अँटी बायोटीक्स औषधोपचार देण्यात आला. यानंतर संबंधित रुग्णाचे घशातील स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. २४ तासांत या तपासणीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. रात्री उशिरापर्यंत तपासणी अहवाल आला नव्हता. दरम्यान, हा प्रकार शहरात कळल्याने अनेक रुग्ण व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. याकरिता वैद्यकीय अधिकार्‍यांनी रुग्णांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला आहे. /(प्रतिनिधी)

-------------

बाहेरगावी जाऊन आल्यानंतर अशा संसर्गजन्य रोगांचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे शहरातील प्रत्येकाने नाकाला रुमाल बांधून फिरावे, शिंकताना रुमाल जवळ असावा, तसेच अनावश्यक व गर्दीच्या ठिकाणी आवश्यकता नसल्यास जाणे टाळावे, असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कालिदास चौधरी यांनी केले आहे.