शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:41 IST

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल्याची स्थिती शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली. पाहणी केलेल्या १८ पैकी चारच ठिकाणी वाहतूक पोलीस दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल्याची स्थिती शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली. पाहणी केलेल्या १८ पैकी चारच ठिकाणी वाहतूक पोलीस दिसून आले.शहरातील बाजारपेठ भागासह बसस्थानक, रेल्वेस्थानक, नारायणचाळ आदी भागात वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होत आहे. शहरातील रस्ते जुने असून एकेरी वाहतुकीचे हे रस्ते आहेत. या रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहतूक होते. शिवाय वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी केली जातात. परिणामी शहरातील रस्त्यांवरुन वाहने चालविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शहरातील नारायण चाळ परिसरात गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली. चारही बाजुंच्या वाहनांमध्ये रुग्णवाहिका अडकून पडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. तब्बल २० मिनिटे रुग्णवाहिका वाहनाच्या गराड्यात अडकून पडली. त्यानंतर काही नागरिक व वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी ही वाहतूक सुरळीत करुन रुग्णवाहिकेला रस्ता उपलब्ध करुन दिला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘लोकमत’ने दोन पथकांमार्फत शहरातील वर्दळीच्या १८ ठिकाणची पाहणी केली. परंतु, या पाहणीमध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बसस्थानक, शिवाजी चौक या चारच ठिकाणी वाहतूक पोलीस आढळून आले. शहरातील वसमतरोडवरील वसंतराव नाईक पुतळा परिसरात दुपारी १२.४८ वाजता भेट दिली तेव्हा एकही वाहतूक पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. त्यामुळे चारही बाजुंनी येणारे वाहनधारक आपल्या सोयीनुसार मार्ग काढत वाहन चालविताना दिसून आले. १२.५८ वाजता विद्यापीठ गेट समोरील काळी कमान परिसरात भेट दिली असता तेथेही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. तर वाहनधारक आपल्या सोयीनुसार वळण घेत होत होते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी दिसून आली. १.०५ वाजेच्या सुमारास खानापूर फाटा येथे भेट दिली असता या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी दिसला नाही.दुसºया पथकाने दुपारी १ वाजता शिवाजी चौकात पाहणी केली असता वाहतूक शाखेचे एक पुरुष व एक महिला कर्मचारी विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांवर कारवाई करताना दिसून आले. त्यानंतर १.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व १.१६ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या परिसरात भेट दिली तेव्हा या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी आढळून आले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात मागील काही दिवसांपासून चांगलीच वाहनांची वर्दळ होत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी तरी वाहतूक शाखेचे कर्मचारी असतील, अशी अपेक्षा होती. परंतु, तेथे १.२५ वाजता भेट दिली असता कोणीही दिसून आले नाही. त्यामुळे वाहनधारक आपल्या मनाला वाटेल तशी वाहने चालवितांना दिसून आले. त्यानंतर १.२६ वाजता बसस्थानकासमोर एक वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असताना दिसून आला. त्यानंतर १.३० वाजता उड्डाणपूल, १.३५ वाजता जांब नाका, १.४० वाजता रायगड कॉर्नर, १.४२ वाजता गणपती चौक, १.४५ विसावा कॉर्नर, १.५५ वाजता गांधी पार्क, २ वाजता नानलपेठ २.१५ वाजता नारायण चाळ, २.३० डॉक्टर लेन परिसरात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी आढळून आला नसल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असणे आवश्यक असतानाही ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत १८ पैकी केवळ चारच ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसून आले.