शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बोर्डीकरांच्या बैठकीत युती आणि आघाडीच्या उमेदवारांवर जोरदार टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 19:44 IST

भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी चालविली आहे.

परभणी- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घ्यावयाच्या राजकीय भूमिकेसंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या समर्थकांच्या बैठकीत माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कार्यकर्त्यांनी आघाडी व युतीच्या उमेदवारांवरच जोरदार हल्लाबोल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे बोर्डीकरांनी निवडणूक लढविण्याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगून सर्व कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे. 

भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी चालविली आहे. शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढतील व भाजपाची उमेदवारी आपणाला मिळेल, असा त्यांचा अंदाज होता; परंतु, राज्यस्तरावर दोन्ही पक्षांची युती झाली. त्यामुळे बोर्डीकर यांची गोची झाली. निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी दिल्या. तयारी केली; परंतु, प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता संपल्याने या निवडणुकीत काय राजकीय भूमिका असावी, याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी परभणीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. 

मेघना बोर्डीकर यांचा हल्लाबोल या बैठकीत बोलताना मेघना बोर्डीकर यांनी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर व युतीचे उमेदवार खा.बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशा काही जणांकडून नुस्त्याच गप्पा केल्या जातात; परंतु, ते आपण प्रत्यक्षात करुन दाखविले, असे सांगून त्यांनी मतदारसंघाचा विकास खुंटल्याचा आरोप खा. जाधव यांच्यावर केला. तर वडील माजी आमदार होते. स्वत: उमेदवार राज्यमंत्री दर्जा असलेले जि.प.अध्यक्ष होते, आता जि.प.सदस्य आहेत. बाजार समितीचे सभापती आहेत. तरीही लोकांकडून निधी गोळा करण्याची नौटंकी करीत आहेत. त्यांची ही नौटंकी चालणार नाही. भावनिक बाबींना परभणीची जनता आता थारा देणार नाही, असे सांगून आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

बोर्डीकरांना राज्यभरातील 'दादा' ओळखतात सोशल मीडियावर त्यांच्यावर केल्या जात असलेल्या टिकेचा समाचार घेऊन त्यांनी महिला म्हणून मला कमजोर समजू नका, मी बोर्डीकरांची कन्या आहे आणि बोर्डीकरांना राज्यभरातील ‘दादा’ ओळखतात, असे बोर्डीकरांच्या स्वरात सांगितले. आजच्या बैठकीची गर्दी ही शक्तीप्रदर्शन असे काही जण सांगतात; परंतु, हे शक्तीप्रदर्शन नसून खरे शक्तीप्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी दाखवून देईल, असे सांगितल्यानंतर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सभागृहात कुजबूज सुरु झाली. काही वेळातच माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी निवडणुकीसंदर्भातील भूमिका येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले.  

निवडणूक लढविण्याची शक्यता कमीचसोमवारच्या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी भाषणामध्ये युतीचा धर्म बाजुला ठेवून शिवसेनेला लक्ष केले. तर राष्ट्रवादीचाही समाचार घेतला. त्यानंतर प्रारंभी मेघना बोर्डीकर यांनी भाषणाच्या प्रारंभी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. दोन्ही प्रमुख उमेदवारांवर जोरदार टिका केली. त्यामुळे त्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु असतानाच दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. तर माजी आ.बोर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकसानकारक होईल, अशी कोणतीही कृती करणार नाही, असे सांगून आपली भूमिका उपस्थितांना कळाली असेल, असे सूचक भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या भाष्यावरुन राजकीय जानकार मेघना बोर्डीकर या निवडणूक लढविण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगत आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक