शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची आज निवड : वरपूडकर-बोर्डीकरांच्या अस्तित्वाची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:03 IST

जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने एकमेकांच्या समोरासमोर आले असून, मंगळवारी त्यांच्या अस्तित्वाची परीक्षा होणार आहे़ दिग्गज नेते मंडळींचा या प्रक्रियेत सहभाग असल्याने परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे या घटनेकडे लक्ष लागले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने एकमेकांच्या समोरासमोर आले असून, मंगळवारी त्यांच्या अस्तित्वाची परीक्षा होणार आहे़ दिग्गज नेते मंडळींचा या प्रक्रियेत सहभाग असल्याने परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे या घटनेकडे लक्ष लागले आहे़परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची १५ मे रोजी निवड होणार आहे़ या संदर्भातील निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधकांनी न्यायालयाच्या आदेशानंतर काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता़ तीन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळी असलेल्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत मोठे बदल घडले आहेत़ जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे एकाच पॅनलमधून निवडून आले होते़कालांतराने वरपूडकर यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर बोर्डीकर यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे़ ही निवडणूक पक्षविरहित होत असली तरी दोन्ही नेत्यांच्या अस्तित्वाची परीक्षा घेणारी ठरली आहे़ वरपूडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ मधुसूदन केंद्रे, कळमनुरीचे काँग्रेसचे आ़ डॉ़ संतोष टारफे, वसमतचे माजी आ़ जयप्रकाश दांडेगावकर यांचे समर्थन आहे़तर बोर्डीकर यांना हिंगोलीचे भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे, हिंगोलीचे माजी आ़ साहेबराव पाटील गोरेगावकर यांचे समर्थन आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डीकर यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व असून, ही बँक ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी यावेळी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी मनपातील विरोधी पक्षनेते विजय जामकर यांचे नाव पुढे केले आहे़ वरपूडकर गटाकडून स्वत: सुरेश वरपूडकर हेच या पदासाठी उत्सुक आहेत़ त्यामुळे वरपूडकर विरूद्ध जामकर अशी अध्यक्षपदाची लढत होणार आहे़ बँकेचे एकूण २१ संचालक असून, माजी आ़ कुंडलिकराव नागरे यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे़ तर आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या सदस्यत्वा संदर्भात न्यायालयाचा निर्णय झाला नसल्याने त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही़तसेच माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांना परभणीत प्रवेशास बंदी असल्याने त्यांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही़ त्यामुळे १८ सदस्यांमध्ये ही निवडणूक होत आहे़ या १८ सदस्यांपैकी १० सदस्य वरपूडकर गटाकडे असल्याचे तर ८ सदस्य बोर्डीकर गटाकडे असल्याचे सोमवारी सायंकाळपर्यंत सांगितले जात होते़ बोर्डीकर यांच्या पॅनलमधूनच निवडून आलेले त्यांचे एकेकाळचे कट्टर एक संचालक वरपूडकर यांच्या गटात गेले असून ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बाहेरगावी गेले असल्याचे समजते़ त्यामुळे त्यामुळे ८ सदस्य संख्येवरून बोर्डीकर यांचा आकडा पुढे सरकत नसल्याने त्यांच्या गटासमोर अडचणी वाढल्या असल्याचेही राजकीय जाणकारांचे मत आहे़वरपूडकर यांच्याकडे मात्र दहा सदस्य असून, त्यांच्याच बळावर आपण अध्यक्ष होऊ, असा त्यांचा अंदाज आहे़ दोन्ही गटांकडून अध्यक्षपदासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे़ बोर्डीकर गटाकडून याबाबत जिंतुरातून सूत्रे हलविली जात असून, वरपूडकर हे मात्र स्वत:च विविध संचालकांच्या गाठीभेटी घेत असल्याचे समजते़ त्यात बोर्डीकर यांच्या राजकीय विरोधकांकडून वरपूडकर यांना पुरेपूर मदत केली जात असल्याचेही चित्र आहे़मंगळवारी सकाळी ११़४५ पासून अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होणार असून, दुपारी १़२० वाजता याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे़वरपूडकर यांचा अर्ज रद्द करण्याच्या हालचालीसुरेश वरपूडकर हे स्वत:च अध्यक्षपदाचे उमेदवार असून, त्यांना या पदापासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांकडून वरिष्ठ स्तरावरून सोमवारी हालचाली करण्यात येत असल्याची चर्चा होती़ वरपूडकर यांच्याकडे कारखान्याची थकबाकी असल्यावरून त्यांचा अर्जच रद्द करता येतो का, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे समजते़ यासाठी भाजपाचे हिंगोलीचे आ़ तान्हाजी मुटकुळे व रामप्रसाद बोर्डीकर यांनी पुढाकार घेतल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होती़ या संदर्भात प्रतिक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासकीय पातळीवरून नवीन कोणत्याही घडामोडी घडलेल्या नाहीत़ कोणालाही नोटीस काढलेली नाही़ मंगळवारी घोषित केल्याप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम होईल, असे सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकbankबँकPoliticsराजकारण