शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

Video : थरारक ! गोळीबार करणाऱ्यावर ६ जणांचा तलवारीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 18:03 IST

after firing sword attack of 6 people on the shooter in Parabhani : या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक केली असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत

ठळक मुद्दे गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी शेख सलीम शेख अमीर यास अटक केली आहेतलवारीने मारहाण करणारे सर्व ६ आरोपी मात्र फरार आहेत.

परभणी : शहरातील दर्गा रोड भागात एकाने गोळीबार केल्याची घटना २४ जून रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्यावर त्याच्या घरासमोर जाऊन ६ जणांनी तलवारीने हल्ला केला. या दोन घटनात कोतवाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे २ गुन्हे दाखल झाले आहेत. यात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यास अटक केली आहे, तर त्याचा साथीदार दवाखान्यात उपचार घेत आहे. तलवारीने मारहाण करणारे दुसऱ्या गटातील सर्व ६ आरोपी मात्र फरार आहेत. (  Sword attack of 6 people on the shooter in Parabhani ) 

परभणी शहरातील दर्गा रोड भागात गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातून शेख इम्रान शेख अमीर व शेख सलीम शेख अमीर (रा. एकमिनार मस्जिद) हे जात होते. यावेळी शेख इम्रान याने जुन्या वादातून बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगून एकावर गोळीबार केला. मात्र, समोरील व्यक्ती पळून गेल्याने पिस्टलमधील गोळी एका कारला (एमएच १२ पीक्यू ०५०३) लागली. यामध्ये शेख इस्माईल शेख युनूस (रा.वसमत, जि.हिंगोली) यांच्या वाहनांचे नुकसान झाले. यावेळी एका घराच्या पाठीमागून मोहम्मद रिजवान, अली चाऊस, रिजवान खान, मोहम्मद रिजवान उर्फ एमआर यांचे वडील, झिया व अन्य एक इसम आले. त्यातील एकाजवळ तलवार होती. त्याने व नंतर त्याच्याकडून तलवार घेऊन इतरांनी शेख इम्रान शेख अमीर व शेख सलीम शेख अमीर यांच्यावर हल्ला केला. यात शेख इम्रान हा गंभीर जखमी झाला. यानंतर मारहाण करून आरोपी पळून गेले. 

या दोन्ही घटनेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी शेख सलीम शेख अमीर यास अटक केली आहे तर अन्य एक जण दवाखान्यात उपचार घेत आहे. तलवारीने मारहाण केलेल्या घटनेतील सर्व सहा आरोपी शुक्रवारी दुपारपर्यंत फरार असल्याची माहिती कोतवालीचे सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी दिली. या दोन्ही घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुरनर करीत आहेत. दरम्यान, ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी