शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! रस्ता का अडवला म्हणत डॉक्टराने केला दुचाकीस्वारावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:03 IST

रस्ता अडविल्याच्या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादानंतर एका डॉक्टरने दुचाकीस्वारा त्याचा सोबतच्यांवर बंदुकीतून झाडलेल्या गोळीने एक जण जखमी झाला आहे.

ठळक मुद्देवादातून डॉ. मगर यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

परभणी : रस्ता अडविल्याच्या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादानंतर एका डॉक्टरने बंदुकीतून झाडलेल्या गोळीने एक जण जखमी झाल्याची घटना २९ आॅक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील हॉटेल निरज समोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गोळीबार करणा-या डॉक्टरास पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी-   परभणी तालुक्यातील नांदखेडा येथील रामचंद्र रावसाहेब सावंत त्यांचे भाऊ विश्वंभर रावसाहेब सावंत आणि आणखी एक जण असे तिघे दुचाकीवरुन बसस्थानक परिसरातील निरज हॉटेलसमोरुन जात होते. त्यावेळी रस्त्यातच त्यांची गाडी बंद पडली. याच वेळी डॉ.प्रसाद मगर हे सुद्धा याच मार्गावरून चारचाकी गाडीतून येत होते. यावेळी सावंत आणि डॉ. मगर यांच्यात रस्ता अडल्यामुळे वाद झाला. 

या वादातून डॉ. मगर यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी विश्वंभर रावसाहेब सावंत यांच्या डाव्या पायाला लागली. त्यानंतर जखमी विश्वंभर सावंत यांना उपचारासाठी तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी, नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर, सहायक निरीक्षक सुनील गिरी यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉ.प्रसाद मगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त केली. 

दरम्यान, या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. रामचंद्र रावसाहेब सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २९ आॅक्टोबर रोजी मी व माझा भाऊ दुचाकीने जात असताना वाटेत दुचाकी बंद पडली. त्यावेळी डॉ.प्रसाद मगर यांनी आपल्याला शिवीगाळ करीत गोळी झाडली. त्यात माझे भाऊ विश्वंभर सावंत जखमी झाले. दुस-या बाजूने डॉ.प्रसाद मगर यांनीही तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मी कारमधून जात असताना विश्वंभर सावंत, रामचंद्र सावंत अन्य एकाने रस्ता अडवून मला शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक निरीक्षक सुनील गिरी, जमादार बन्सी मुलगीर तपास करीत आहेत.