शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी पकडलेला वाळु वाहतुक करणारा ट्रक तहसील कर्मचा-यांनी क्षणार्धात दिला सोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 15:22 IST

गंगाखेड तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी वाळूची वाहतूक करणा-या वाहनास ३१  आॅक्टोबर रोजी पकडले होते. परंतु, पकडलेले वाहन तहसीलच्या कर्मचा-यांनी सोडून दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे३१ आॅक़्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मैराळ सावंगी येथून खळीमार्गे परभणीकडे वाळूने भरलेले टिप्पर जात होते. खळी ग्रामस्थांनी हे टिप्पर मारोती देवस्थान जमिनीजवळ अडविले. तेथील एका हॉटेलवर कर्मचारी व टिप्पर चालक-मालकाने चहापाणी घेतले. त्यानंतर हे वाहन कर्मचा-याने सोडून दिले.

परभणी  : गंगाखेड तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी वाळूची वाहतूक करणा-या वाहनास ३१  आॅक्टोबर रोजी पकडले होते. परंतु, पकडलेले वाहन तहसीलच्या कर्मचा-यांनी सोडून दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

गंगाखेड तालुक्यातील खळी, मैराळ सावंगी, चिंचटाकळी, गौंडगाव आदी परिसरातून रात्र-दिवस वाळूचा उपसा होत आहे. या वाळू उपस्याच्या त्रासाला कंटाळून खळी येथील ग्रामस्थांनी वाळू उपस्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला. ३१ आॅक़्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मैराळ सावंगी येथून खळीमार्गे परभणीकडे वाळूने भरलेले टिप्पर जात होते. खळी ग्रामस्थांनी हे टिप्पर मारोती देवस्थान जमिनीजवळ अडविले. यावेळी चालक व मालकाने अडविलेले टिप्पर सोडून देण्यात यावे, अशी विनवणी केली. परंतु, ग्रामस्थांनी नकार दिला. त्यानंतर ही माहिती तहसीलदार आसाराम छडीदार, तलाठी चंद्रकांत साळवी यांना दिली.

याचवेळी खळी पाटीवर महसूल विभागाचे कर्मचारी आले होते. वाहनचालक व मालकाने खळी पाटीवर थांबलेल्या कर्मचा-यांकडे धाव घेतली. तेथील एका हॉटेलवर कर्मचारी व टिप्पर चालक-मालकाने चहापाणी घेतले. त्यानंतर हे वाहन कर्मचा-याने सोडून दिले. याबाबत  ग्रामस्थांनी कर्मचा-यांना विचारणा केली असता त्या कर्मचा-यांनी काहीच माहित नसल्याचे सांगितले व बोलण्याचे टाळले़ यावेळी प्रहार संघटनेचे सुरेश विखे, ओंकार पवार, रमेशराव पवार आदीची उपस्थिती होती. दरम्यान, छडीदार यांनी पाठविलेले कर्मचारी येण्या आगोदरच वाहन निघुन गेल्याने आलेले कर्मचारीही रिकाम्या हाताने परतले.