एक महिन्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य बुवाजी जिवने यांच्या घरी चाकूचा धाक दाखवून २ लाखांची धाडसी चोरी झाली होती. या घटनेतील चोरटे पोलिसांना हाती लागले नाहीत. त्यातच १० सप्टेंबरच्या मध्यरात्री कौसडी येथील स्वस्त धान्य दुकानदार आयुब पठाण यांच्या घरावर चोरटे चढून घरात प्रवेश करीत असताना घरातील मंडळींना जाग आल्यामुळे चोरटे पसार झाले. मागील एक महिन्यापासून गावात वेगवेगळ्या ठिकाणी चोरटे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांना मागील एक महिन्यापासून आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी राहावे लागत आहे. याबाबत पोलिसांनी रात्रीची गस्त करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
चोरट्यांनी कौसडी ग्रामस्थांची उडवली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST