शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

असेही घडले ! बराच वेळ शौचालयाचा दरवाजा बंद असल्याने आत्महत्येच्या संशयाने तासभर उडाला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 19:22 IST

बसस्थानकातील शौचालयाचा दरवाजा बंद असल्याने संशय 

ठळक मुद्दे परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील प्रकार 

देवगावफाटा : सेलू येथील सार्वजनिक स्वच्छतागृहातील एका खोलीचा दरवाजा तब्बल एक तास बंद राहिल्याने या खोलीत कोणीतरी आत्महत्या केली असावी, या संशयाने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलीस कर्मचाऱ्यांनी बंद दार उघडले असता, आतमध्ये कोणीही नसल्याचे स्पष्ट झाल्याने या गोंधळावर पडदा पडला. हा सर्व प्रकार ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला.

सेलू बसस्थानकातील सुलभ शौचालयाचा दरवाजा सोमवारी दुपारी ४ वाजेपासून आतमधून बंद होता. तब्बल एक तासापर्यंत प्रतीक्षा केल्यानंतरदेखील कोणीही बाहेर येत नसल्याने शौचालयात कोणी तरी आत्महत्या केली असावी, असा संशय निर्माण झाला. त्यामुळे या परिसरात बघ्यांची गर्दी जमली. अखेर सुलभ शौचालयचालकांनी ही माहिती पोलिसांना दिली. सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास जमादार संजय साळवे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडण्याऐवजी शौचालयाच्या खिडकीतून आत प्रवेश करीत दरवाजा उघडण्यात आला. यावेळी शौचालयात कोणीही नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा गोंधळ थांबला.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी