शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात नवीन रेशन दुकान देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 16:16 IST

रेशन दुकानाच्या नवीन परवाने देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरु होती. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देजिल्हा पुरवठा विभागाने ८ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले होते. तर १६ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली होती.जाहीर नाम्यानुसार रद्द व निलंबित परवान्याच्या जागी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

परभणी : जिल्ह्यात रद्द अथवा निलंबित झालेल्या रेशन दुकानांची मोठी संख्या आहे. अशा रेशन दुकानाच्या जागी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरु होती. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे.

परभणी जिल्ह्यात मागील वर्षी शासकीय गोदामातून धान्याचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणानंतर जिल्हा पुरवठा विभागाने ८ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले होते. तर १६ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली होती. या कारवाईनंतर शासनाच्याच आदेशानुसार नवीन परवाने देण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीर नाम्यानुसार रद्द व निलंबित परवान्याच्या जागी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

या प्रक्रियेच्याविरुद्ध काही रेशन दुकानदारांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी हे अपील फेटाळले. त्यामुळे या रेशन दुकानदारांनी मंत्र्यांच्या दालनात धाव घेतली. यावेळी दोन्ही बाजुने चर्चा होऊन रद्द झालेल्या रास्तभाव दुकान, केरोसीन परवान्यांविरुद्धचे अपील नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा किंवा मंत्र्यांकडे निर्णयासाठी प्रलंबित असेल तर त्या ठिकाणी न्यायालय व अपीलावर अंतिम निर्णय होईपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करु नये. तसेच नवीन प्राधिकारपत्र देण्याची कारवाई करु नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रद्द व निलंबित झालेल्या रेशन परवानाधारकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी