शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी धान्य घोटाळा प्रकरणी गोदाम रक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 14:41 IST

शासकीय धान्य वितरणातील माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या 200 पोते धान्य प्रकरणी फरार झालेला पाथरी येथील धान्य गोदामाचा गोदामरक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी परभणी यांनी निलंबित केले आहे.

पाथरी (परभणी ) : शासकीय धान्य वितरणातील माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या 200 पोते धान्य प्रकरणी फरार झालेला पाथरी येथील धान्य गोदामाचा गोदामरक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी परभणी यांनी निलंबित केले आहे. यासोबतच शासकीय धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

पाथरी तालुक्यातील शिधा दुकानाला धान्य पुरवठा करणारा ठेकेदाराचा टेम्पो 200 पोते गहू तांदूळ आणि साखरेसह माजलगाव पोलिसांनी 13 फेब्रुवारी रोजी माजलगाव शहराजवळ सापळा रचून पकडला होता. या घटनेत 2 दिवसानंतर दोन आरोपी विरुद्ध गुन्हा ही दाखल करण्यात आला. यानंतर पकडलेले धान्य पाथरी येथील शासकीय धान्य गोदामातुन उचलले असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. दरम्यान, येथील धान्य गोदाम पाल शेख इम्रान हा धान्याचा टेम्पो पकडला त्या दिवसापासून फरार आहे. दरम्यान, कोणतीही रजा न देता गोदाम रक्षक फरार झाल्याने तहसीलदार यांच्या अहवालावरून जिल्हा पुरवठा विभागाने त्याच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. 

ठेकेदाराला नोटीसशासकीय धान्य वितरणासाठी वापरण्यात येणारे वाहन कोणत्याही शासकीय कार्यालयात न लावता काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्यसाठी वापरण्यात आल्याने धान्य वितरण करण्याऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. यानुसार आपल्यावर दंडात्मक कारवाई का करू नये याचा खुलासा मागविण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मंडवगडे यांनी दिली. 

धान्याचे गौडबंगाल सुटेनाफेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला माल वितरीत करण्यात आलेल्या 14 दुकानाची तपासणी पुरवठा विभागाने केली आहे. यात तफावत आढळली नाही असे पुढे येत आहे. यामुळे येथून आलेला माल कोणाचा याचे कोडे मात्र अद्याप सुटले नाही.

माजलगाव पोलिसांचा पाथरीत तपास

काळ्याबाजारात जाणारे धान्य माजलगाव येथे पकडले असल्याने सध्या अधिक तपासासाठी माजलगाव पोलीस पाथरीमध्ये  झाडाझडती घेत आहेत. मात्र, येथे कार्यरत गोदामरक्षकच फरार असल्याने त्यांना अधिक माहिती मिळत नसल्याचे कळते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारparabhaniपरभणी