विष्णू पांडुरंग गोंडगे (रा. सोगाव पूर्व, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी सेलू पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. आत्महत्या केलेला स्वप्नील घाडगे (२०) हा शिक्षण घेत होता. स्वप्नील याचे टेलिग्रामवरून एमपीएससी ग्रुपमधील वडवणी (जि. बीड) येथील एका २१ वर्षीय तरुणीशी सूत जुळले होते. त्यानंतर प्रेम संबंध असलेल्या या तरुणीसोबत सोयरीक होत नसल्याच्या कारणाने २३ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सेलू शहरातील राजाराम नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्वप्नील घाडगे याने विषारी कीटकनाशक प्राशन केले. या घटनेत स्वप्नीलचा जागीच मुत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटीतीर्थवाले, जमादार एस. एस. वासलवार, पोहेकॉ. बी. जी. पुरणवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी विष्णू पांडुरंग गोंडगे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम संबंधातून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST