शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आजपासून उरुसाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:52 IST

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या ऊरुसाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरुसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या ऊरुसाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरुसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे.दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला परभणीतील ऊरुस हर्षोल्हासात साजरा केला जातो. यावर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान ऊरुस यात्रा भरणार आहे. २ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने स्थानिक सुटी जाहीर केली असून प्रशासनाच्या वतीने मानाचा संदल काढून उरुसाला प्रत्यक्षात प्रारंभ होतो.जिंतूर रोडवरील दर्गा मैदान परिसरात मीना बाजार आणि राहटपाळणे, मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले आहेत. उरुसासाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून व्यापारी परभणीत दाखल होतात. एकंदर उरुसाची शहरात जोरदार तयारी सुरु झाली आहे.संदल काढून होतो उरुसाला प्रारंभराष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या परभणीतील उरुसास संदल काढून प्रारंभ केला जातो़ जिल्हाधिकारी कार्यालयाचा संदल मानाचा संदल असून, जिल्हाधिकारी डोक्यावर संदल घेऊन संदलला प्रारंभ करतात़ या संदलमध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकारी सहभागी होतात़ त्यानंतर जिल्हा वक्फ बोर्ड, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठ, एसटी महामंडळ या विभागांचेही संदल काढले जातात़ तसेच परंपरेनुसार मानाचे संदलही शहरातून निघतात़ २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे़ उरुसाच्या तयारीसाठी महानगरपालिकेने उरुस परिसरामध्ये स्वच्छता, पाण्याची व्यवस्था केली असून, उरुस काळामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बंदोबस्त लावला जातो़

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रमcollectorजिल्हाधिकारी